ETV Bharat / state

Baramati Kidnapping Case : मोटार विक्रीच्या व्यवहारातून विद्यार्थ्याचे अपहरण करत माळशेज घाटात फेकले; बारामतीत गुन्हा दाखल - अपहरण करून माळशेज घाटात फेकले

मोटार विक्रीच्या जुन्या व्यवहाराच्या कारणावरून बारामतीत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याचे स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण (Youth Kidnapping Baramati) करण्यात आले. याप्रकरणी सहाजणांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

baramati police
बारामती पोलीस ठाणे
author img

By

Published : Mar 24, 2022, 10:14 PM IST

बारामती(पुणे) - मोटार विक्रीच्या जुन्या व्यवहाराच्या कारणावरून बारामतीत शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्याचे स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण (Youth Kidnapping Baramati) करण्यात आले. नंतर रस्सीने गळा आवळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी सहाजणांविरोधात बारामती तालुका पोलीस ठाण्यात (Baramati Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नितीन बाळासाहेब कदम (वय २३, रा. वेणेगाव, पो. टेंभुर्णी, ता. माढा, जि. सोलापूर) असे अपहरण झालेल्या युवकाचे नाव आहे.

यासंबंधी मनोज उर्फ बंडू रामदास मुळे (रा. तराळवस्ती, टेंभुर्णी) याच्यासह अन्य पाच जणांचा गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये समावेश आहे. युवकाचे बारामतीतील एका जीममधून अपहरण करून त्याला ठाणे जिल्ह्यातील माळशेज घाटाजवळ आंबे कार्नर येथे सोडण्यात आले होते. तक्रारीत नमूद केल्यानुसार नितीन हा बारामतीत महाविद्यालयीन शिक्षण घेतो. त्याच्याकडे एमएच-४२, एक्स-९२९६ या क्रमांकाची स्कॉर्पिओ गाडी होती. ती त्याने ओळखीच्या मनोज उर्फ बंडू मुळे याला विकली. ऑगस्ट २०२० मध्ये नोटरीद्वारे व्यवहार करण्यात आला. गाडी मुळे याच्या ताब्यात देण्यात आली. परंतु, मुळे याने व्यवहार ठरल्याप्रमाणे पूर्ण पैसे दिले नाहीत. त्यामुळे तक्रादाराने टीटी फॉर्मवर सह्या केल्या नाहीत. टेंभुर्णी पोलीस ठाणे व सोलापूरच्या पोलीस अधीक्षकांना त्याच्या विरोधात अर्ज देण्यात आला. या गोष्टीचा त्याला राग आला होता. त्यामुळे तो नितीन याला धमकावत होता.

कसा आहे घटनाक्रम? : २१ मार्चला नितीन हा बारामतीत जीममध्ये व्यायाम करत असताना, मुळे हा अन्य पाच साथीदारांसह तेथे आला. त्याने तक्रारदाराला तू मुलीची छेड काढली आहे, भिगवण पोलीस स्टेशनला चल असे सांगितले. त्यावर तक्रारदाराने मी कोणाचीही छेड काढली नसल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काहीही ऐकून न घेता स्कॉर्पिओ गाडीत बसवले. भिगवणकडून करमाळा रस्त्याकडे त्यांनी हे वाहन नेले. तेथे रात्री नऊ वाजता त्याच्याकडील मोबाईल काढून घेतला. गाडी नावावर करून घेण्यासाठी टीटी फॉर्मवर सह्या करण्यास सांगण्यात आले. तक्रारदाराने नकार दिल्याने त्यांनी लोखंडी डोक्यात मारली. टीटी फॉर्मवर जबरदस्तीने अंगठा घेत ते गाडीतून खाली उतरले. त्यातील एकाने रस्सी आणली. त्याने तक्रारदाराला बांधण्यात आले. चेहऱयावर टॉवेल टाकण्यात आला. याला मारुन मृतदेह माळशेज घाटात टाकू अशी चर्चा त्यांच्यात सुरु होती.

युवकाला माळशेजजवळ फेकण्यात आले : मुळे याने गळा रस्सीने आवळला. त्यात तक्रारदार बेशुद्ध पडला. त्याला जाग आली तेव्हा तो कोणत्या ठिकाणी आहे हे समजत नव्हते. घाटातून चालत तो पायी वर गेला. तेथे काम सुरु असलेल्या कामगारांना त्याने हे ठिकाण कोणते आहे अशी विचारणा केली असता, आंबे कार्नर, माळशेज घाट असल्याचे त्याला सांगण्यात आले. एका ट्रकचालकाची मदत घेत तक्रारदार लगतच्या टोकावडे पोलीस स्टेशनला गेला. तेथून त्याने कुटुंबियांना फोन करत ही घटना सांगितली. उपचारानंतर त्याने बारामतीत आल्यावर या प्रकरणी तक्रार दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.