ETV Bharat / state

Pune : राष्ट्रपती पदक मिळविण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर, पुणे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल - पुणे राष्ट्रपती पदक बातमी

राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर ( Missused Of Police Administration For President Medal ) करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन लिपीकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune President Medal Police Officer FIR
Pune President Medal Police Officer FIR
author img

By

Published : Mar 11, 2022, 12:36 PM IST

पुणे - राष्ट्रपती पदक मिळवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा गैरवापर ( Missused Of Police Administration For President Medal ) करीत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलीस दलातील एका पोलीस कर्मचाऱ्यासह दोन लिपीकांवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गणेश अशोक जगताप, नितेश अरविंद आयनुर, रविंद्र धोंडीबा बांदल, अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या तिघांवर काल रात्री वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या संदर्भात वरिष्ठ लिपिक संतोष प्रतापराव भोसले यांनी तक्रार दिली होती.

हा प्रकार 26 जुलै 2017 ते 29 जानेवारी 2020 या कालावधीत घडला आहे. पोलीस हवालदार गणेश जगताप सध्या विशेष शाखेत आहे. 2017 ते 2020 या कालावधीत वानवडी पोलीस ठाण्यात होते. स्वतःच्या फायद्यासाठी आणि राष्ट्रपती पोलीस पदक मिळवण्यासाठी गुन्हेगारी कट करून शासनाची फसवणूक करण्यासाठी सेवापुस्तकातील नोंदीचे बनावटीकरण करून खोटा दस्त तयार केला. त्यावर बनावट सह्या करून सरकारी शिक्यांचा गैरवापर केला असल्याचे म्हटले आहे.

काय आहे प्रकरण -

जगताप यांन १३ फेब्रुवारी २०१८ रोजी शिक्षा देण्यात आली होती. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी वानवडी पोलीस ठाण्यातील डे बुक अंमलदारांची होती. मात्र, त्यांनी या शिक्षेची अंमलबजावणी न करता जगताप याला मदत केली. राष्ट्रपती पदकासाठी आपली कामगिरी योग्य आहे, असे वाटल्यास प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी वरिष्ठांकडे अर्ज करु शकतो. त्यानुसार, गणेश जगताप गेले काही वर्षे अर्ज करीत होते. त्यात आपल्याला कोणतीही शिक्षा झालेली नाही अथवा चौकशी प्रलंबित याचे प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. जगताप यांनी राष्ट्रपती पदकासाठी अर्ज केला होता. त्याची चौकशी करत असताना त्याच्या सेवा पुस्तकात दुसरे पान जोडलेले आढळून आले. त्यानंतर गणेश जगताप आणि त्याला मदत करणारे लिपिक, डे बुक अंमलदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - Sanjay Raut : अन्यायाविरोधात आवाज उठवणे म्हणजे तपास यंत्रणांवर दबाव होत नाही -राऊत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.