बारामती (पुणे) - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सहीचा गैरवापर करून मुंबई येथील बांधकाम व्यावसायिकाची फसवणूक केल्याप्रकरणी बारामती शहरातील तुषार तावरे (रा.तारांगण सोसायटी, बारामती) याच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावर तक्रारदाराने घाबरून आरोपी तुषार तावरे यांच्याशी संपर्क साधला असता. तावरे यांनी तक्रारदाराला तुमच्याविरुद्ध दिलेला अर्ज मी आयुक्तांकडे न पाठवता माझ्याकडे ठेवला आहे. तुमचे व अर्जदार यांचे जे वाद आहेत ते तीन दिवसात मिटवून घ्या नाही तर आपल्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल. यावर तक्रारदाराने घाबरलेल्या अवस्थेतच उपमुख्यमंत्री कार्यालयाशी संपर्क साधला असता. तुषार तावरे नावाची कोणतीही व्यक्ती कार्यालयात काम करत नाही, असे सांगण्यात आले. पवार यांचे सहाय्यक सुनील मुसळे यांनी कामदार यांना कायदेशीर कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार तक्रारदार अजय कामदार यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस ठाण्यात आरोपी तुषार तावरे यांच्याविरोधात तोतयेगिरी करून फसवणूक केल्याप्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवड शहरातून महागड्या दुचाकी चोरणाऱ्या टोळीला अटक, कर्नाटकच्या दोघांचा समावेश