ETV Bharat / state

Fight Against Dowry : हुंड्याविरोधात लढाई! हुंड्यासाठी जमा केलेल्या पैशातून 'तिनं' सर केली जगातील विविध शिखरं

Fight Against Dowry : हुंड्यासाठी त्रास दिल्याची अनेक प्रकरणं आजही समाजात घडताना पाहायला मिळतात. पुण्यातील एका तरुणीनं हुंड्यासाठी जमा केलेल्या रकमेतून जगातील अनेक शिखरं सर करत एक आगळ्यावेगळ्या पद्धतीनं हुंड्याविरोधात नारा दिलाय. पाहुयात या तरुणीची कहाणी...

Fight Against Dowry
Fight Against Dowry
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 24, 2023, 9:41 AM IST

Updated : Sep 24, 2023, 9:49 AM IST

हुंड्याविरोधात स्मिता घुगेची लढाई

पुणे : Fight Against Dowry : आजही 21 व्या शतकात हुंड्यासाठी अनेकांचं जीवन उध्वस्त होताना आपण पाहिलंय. आजही हुंड्यासाठी तरुणींना त्रास देतानाची अनेक प्रकरणं समाजात घडताना (Smita Ghuge Against Dowry) पाहायला मिळतात. अशातच पुण्यातील एका गिर्यारोहकानं हुंड्यासाठी जमा केलेल्या रकमेतून जगातील अनेक शिखरं सर करत हुंडाविरोधी नारा दिलाय.

हुंड्याविरोधात आगळीवेगळी लढाई : पुण्यातील धनकवडी येथील स्मिता घुगेला लग्नासाठी विविध ठिकाणांहून स्थळं येत होती. जेव्हा स्थळं यायची तेव्हा प्रामुख्यानं मुलांकडून मोठ्या रकमेचा हुंडा मागितला जात होता. तेव्हा या हुंड्याविरोधात स्मितानं स्वतःचं कर्तुत्व वाढवण्याला प्राधान्य देत ट्रेकिंग करायला सुरुवात केली. यातून जे पैसे तिनं हुंड्यासाठी जमा केले होते, त्याच पैशांतून तिनं जगभरातील अनेक शिखरं सर केली. या माध्यमातून आज ती हुंड्याविरोधात एक आगळीवेगळी लढाई लढत आहे.

हुंड्याच्या पैशांतून शिखर सर : याबाबत स्मिता घुगे म्हणाली की, माझ्या समाजात हुंडा खूप मागितला जायचा आणि हे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू होतं. तेव्हा मी ठरवलं की हुंडा न देताच मी लग्न करणार आहे. पण जेव्हा जेव्हा मला स्थळ येत होती, तेव्हा तेव्हा मुलांकडून कधी 20, कधी 10 तर कधी 15 लाख हुंड्याची मागणी होत होती. तेव्हा हुंड्यासाठी जमा केलेल्या पैशांतून जगातील उंच शिखर सर करण्याचा निर्णय घेतला. स्मिता पुढे सांगते की, सुरुवातीला कळसूबाई शिखर तसंच हरिश्चंद्रगडचा कोकणकडा सर केला. परंतू, 'हाय अल्टिट्युड' वरील माउंट किलीमांजारो हे शिखर पूर्ण करण्याचं माझं ध्येय होतं. त्यासाठी एव्हरेस्टवीर आनंद बनसोडेंनी मार्गदर्शन केलं. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी 'हुंडाविरोधी' नारा देत आफ्रिका खंडातील सर्वोच्च आणि चढण्यासाठी अतिशय अवघड असलेल्या माउंट किलीमांजारो (Mount Kilimanjaro) हे शिखर 15 ऑगस्ट 2021 ला सर करत आपला तिरंगा ध्वज फडकावला.

शरीरापेक्षा कर्तुत्वाची उंची वाढवावी : माझ्या या निर्णयात मला प्रामुख्यांनं घरच्यांनी साथ दिल्याचं स्मितानं सांगितलं. पण हे इथच थांबल नाही तर, आताही जे स्थळ येतात त्यात तर काही मुलं म्हणतात उंची कमी आहे, नोकरी चांगली नाही अशी कारणं देतात. शरीराच्या उंचीपेक्षा कर्तुत्वाची उंची वाढली पाहिजे, असं तिनं सांगितलं. तसंच हुंड्याविरोधात बोलत असल्यानं मला समाजातून विरोध होतोय, पण त्याकडं लक्ष न देता पुढं जाणार असल्याचं यावेळी स्मितानं सांगितलं.

मुलीचा अभिमान वाटतो : याबाबत स्मिताची आई म्हणाली की, मला माझ्या मुलीचा अभिमान असून तिनं जो निर्णय घेतलाय तो बरोबर आहे. आज ती जे एव्हरेस्ट सर करत आहे, ते तिच्या पैशांतून करत आहे. आम्ही तिला कोणतेही पैसे दिले नाही. पण मुलीचं स्थळ बघायला येणारी लोकं मुलीचं कर्तुत्व न बघता थेट हुंडा मागतात, याचं दुःख होत असल्याचं स्मिताच्या आईनं सांगितलं. मुलीचं लग्न चांगल्या ठिकाणी व्हावं पण फक्त हुंड्यासाठी मुलीचं लग्न होणं हे चुकीचं असून आज आम्ही आई-वडील म्हणून तिला साथ देत आहोत. पण समाजातील लोक टीका करत वेगळ्या नजरेनं बघतात. हे चुकीचं असल्याचं आशा घुलेंनी सांगितलं.

हेही वाचा :

  1. Gruhita Vichare : आफ्रिकेतील माऊंट किलीमांजारो शिखरावर ठाण्याच्या चिमुकलीने फडकवला तिरंगा
  2. Youngest Reach Jivdhan fort in Nauvari Saree : आठ वर्षाच्या चिमुकलीने नऊवारी साडी नेसून पार केला जीवधन सुळका, वाचा हा खास रिपोर्ट
  3. Child Success Story: अविश्वसनीय! ५ वर्षाच्या मुलीने चिमुललीने सर केले माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प

Last Updated : Sep 24, 2023, 9:49 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.