दौंड(पुणे) - दौंड तालुक्यात बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणारा प्रकार घडला आहे. बापानेच आपल्या अल्पवयीन 13 वर्षीय पोटच्या मुलीवर बलात्कार केला आहे. नराधम बापाला यवत पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या आईने नवऱ्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बापानेच बलात्कार केल्याची धक्कादायक घटना
जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना दौंड तालुक्यातील एका गावात घडली आहे. तसेच याप्रकरणी नराधम बापाला यवत पोलिसांनी बेडया ठोकल्या आहेत, अशी माहिती यवत पोलिसानी दिली आहे. शुक्रवारी (ता. 19) संध्याकाळी ही घटना घडली.
नराधम बापास अटक
याबाबत पीडित मुलीच्या आईने यवत पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. आईच्या तक्रारीवरून यवत पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला व पोलिसांनी तात्काळ या नराधमास अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे हे करत आहेत.