पुणे - शहरात प्लास्टिकच्या वापराबाबत जनजागृती करण्यासाठी एका आगळ्यावेगळ्या फॅशन शोचे आयोजन करण्यात आले होते. या फॅशन शोमध्ये रॅम्पवॉक करणाऱ्या मॉडेल्सनी चक्क प्लास्टिक कचऱ्यापासून तयार केलेले पोशाख परिधान केले होते. मिस आणि मिसेस अर्थ या स्पर्धेच्या आयोजनातून पर्यावरण रक्षणाचा संदेश पुणेकरांना देण्यात आला.
हेही वाचा - ईशान्येकडील विद्यार्थ्यांचा फॅशन डिझायनिंग अभ्यासक्रमांकडे वाढतोय कल
मोठ्या शहरांमध्ये दिवसेंदिवस वाढणाऱ्या प्लास्टिकच्या कचऱ्याचे योग्य नियोजन व्हावे. तसेच त्याचा पुनर्वापर केला जावा, हा संदेश देण्याच्या दृष्टीकोणातून या फॅशन शोचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले आहे.