पुणे - केंद्र सरकारने शेतकरी व कामगारांशी कोणतीही चर्चा न करता शेतकरी व कामगार विधेयक संमत केले आहे. या विधेयकामुळे शेतकरी, कामगार, ग्राहकांना मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे, असे म्हणत या विरोधात आज 26 संविधान दिनी देशातील सर्व शेतकरी व कामगार संघटनांनी बंद पुकारला आहे. पुणे शहरातही अनेक संस्था-संघटनांच्यावतीने बंद पुकारण्यात आला असून विविध शेतकरी व कामगार संघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुरक्षा हक्क रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या सुरक्षा हक्क रॅलीत अनेक संस्था संघटनांनी सहभाग दर्शवत रॅलीत सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
शेतकरी, कामगार संघटनांतर्फे आज भारत बंद; पुण्यात विविध संस्था-संघटनांतर्फे मोर्चा
केंद्र सरकारच्या नवीन कायद्यांविरोधात आंदोलन करत आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. पुणे शहरातही अनेक संस्था-संघटनांच्यावतीने बंद पुकारण्यात आला असून विविध शेतकरी व कामगार संघटनांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सुरक्षा हक्क रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.