पुणे- मांसाहार (नॉन व्हेज) खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे पुण्यातील दोन शेतकऱ्यांनी शेतीला जोड व्यवसाय म्हणून खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. यातून त्यांना चांगला नफा देखील मिळत आहे.
हेही वाचा- तरुणावर अनैसर्गिक बलात्कार करणाऱ्या चार आरोपींना अटक
शेतकऱ्यांना कधी आस्मानी तर सुलतानी संकटाचा सामना करावा लागलो. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र, शेतकरी सध्या शेतीवरच अवलंबून न राहता त्यासोबतच जोड व्यवसाय करीत आहेत. पुण्यातील जुन्नर तालुक्यामधील मेंगाळवाडी येथील वारे कुटुंबाने शेतीसोबत खेकडे पालनाचा व्यवसाय सुरू केला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून त्यांनी याबात माहिती मिळवली आहे. त्यांच्याकडे दीड एकर शेती आहे. त्यातच त्यांनी हा व्यवसाय सुरू केला.
या व्यवसायाला श्रम आणि जागा कमी लागते. एका मोठ्या पाण्याच्या टाकीत देखील हा व्यवसाय सुरू करता येतो. यातील दर 15 दिवसांनी पाणी बदलावे लागते. त्याच बरोबर सोशल मीडियाचा वापर करत याची मार्केटिंग केली जाते. त्याचा मोठा फायदा होत असल्याचे या कुटुंबीयांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.