ETV Bharat / state

'अवकाळीने कांदा पीक नेले अन् आता लॉकडाऊनमुळे काकडी शेतात सडतेय' - शेतकरी नुकसान

तालुक्यातील तरटगाव येथील शेतकरी सौदागर ननवरे यांचा काकडीचा प्लॉट फक्त बाजारपेठ मिळत नसल्याने जागेवर सडत आहे. काकडी पिकाआधी ननवरे यांनी त्यांच्या याच प्लॉटमध्ये कांद्याचे पीक घेतले होते. मात्र, अवकाळी पावसाने  त्यांचे कांद्याचे संपूर्ण पीक वाया गेले. तसेच त्यांच्या क्षेत्रातील  स्वीट कॉर्न (मका पीक) ही वाया गेल्याने ननवरे यांचे सुमारे सात लाख रुपयांचे  नुकसान झाले आहे.

baramati pune news  farmer loss pune news  lockdown effect  लॉकडाऊन इफेक्ट  शेतकरी नुकसान  बारामती पुणे न्युज
'अवकाळीने कांदा पीक नेले अन् आता लॉकडाऊनमुळे काकडी शेतात सडतेय'
author img

By

Published : May 1, 2020, 7:58 AM IST

पुणे - शेती हा एकमेव उत्पन्नाचा स्त्रोत असल्याने तो टाळेबंदीमुळे अडचणीत आला आहे. टाळेबंदीनंतर पुढील काही दिवसात जनजीवन सुरळीत होईल. तेव्हा रोजच्या उपजिविकेबरोबरच मुलांच्या शिक्षणासाठी लागणारा खर्च आणि शेतीच्या मशागतीनंतर ही झालेली हानी कशी भरून काढावी, या प्रश्नांच्या विवंचनेत इंदापूर तालुक्यातील शेतकरी सापडले आहेत.

तालुक्यातील तरटगाव येथील शेतकरी सौदागर ननवरे यांचा काकडीचा प्लॉट फक्त बाजारपेठ मिळत नसल्याने जागेवर सडत आहे. काकडी पिकाआधी ननवरे यांनी त्यांच्या याच प्लॉटमध्ये कांद्याचे पीक घेतले होते. मात्र, अवकाळी पावसाने त्यांचे कांद्याचे संपूर्ण पीक वाया गेले. तसेच त्यांच्या क्षेत्रातील स्वीट कॉर्न (मका पीक) ही वाया गेल्याने ननवरे यांचे सुमारे सात लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

तसेच, अनिल भांगे यांनी त्यांच्या चार एकर क्षेत्रात टोमॅटो, टरबूज पिकासाठी सुमारे ५ ते ६ लाख रुपये खर्च केला होता. मात्र, उठाव नसल्याने त्यांचा माल शेतातच पडून आहे. त्यामुळे सुमारे ८ ते दहा १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे भांगे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या भागातील अनेक शेतकऱ्यांची काढणीला आलेली फळपीके, भाज्या नाईलाजास्तव अगदी मातीमोल किमतीत विकली जात आहेत. त्यामुळे येथील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर लागू असणाऱ्या टाळेबंदीमुळे बाजारपेठा बंद असल्याने मालाचा उठाव ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल शेतातच सडू लागला आहे. तसेच कवडीमोल किमतीने तो विकावा लागत आहे. अवकाळी व टाळेबंदीमुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे फळे व फळभाज्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. शासनाने शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाचा विचार करून योग्य ती भरपाई द्यावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करत आहेत.

पुणे, मुंबई, वाशी, सोलापूर आदी शहरातील मार्केटमध्ये इंदापूर भागातील स्वीट कॉर्न, कांदा, काकडी, टरबूज, टोमॅटो अशी फळे निर्यात केली जात होती. माञ, टाळेबंदीदरम्यान वाहतूक बंद असल्याने शेतमालाला उठाव नाही. त्यामुळे मोठ्या नुकसानीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. सौदागर ननवरे या शेतकऱ्याचे स्वीट कॉर्न, काकडी, टरबूज, कांदा पिकाचे नुकसान झाले असून त्यांचे ७ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे, तर अनिल भांगे यांचे टोमॅटो पीक वाया गेल्याने १० लाखांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांनी शासनाकडून योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.