ETV Bharat / state

जगण्याच्या संघर्षात पक्ष्यांच्या मदतीला धावला शेतकरी, उभे बाजरी पीक सोडले पक्ष्यांसाठी

author img

By

Published : May 21, 2020, 4:08 PM IST

माणसांना अन्नपाण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. मात्र पशु-पक्षांकडे दुर्लक्ष होत असताना शेतकऱ्याने आपल्या शेतातील संपूर्ण बाजरी पक्षांसाठी राखीव ठेवली आहे. त्यामुळे या शेतकऱ्याचे परिसरात कौतुक होत आहे.

up
जयवंत गावडे, शेतकरी

पुणे - सध्या जगणं आणि जगवण्यासाठीचा संघर्ष सुरू आहे. माणसांना अन्नपाण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे येत आहेत. मात्र पशु-पक्षांकडे दुर्लक्ष होत असताना शेतकऱ्याने आपल्या शेतातील संपूर्ण बाजरी पक्षांसाठी राखीव ठेवली आहे. कोरोनाच्या महामारीचे संकट डोक्यावर असताना मानवी जीवांसह पशु-पक्ष्यांना जगवण्यासाठी यशस्वी लढाई सुरू आहे.

शेतकऱ्याचा आदर्श ; जगण्याच्या संघर्षात पक्ष्याच्या मदतीला धावला शेतकरी, उभे बाजरी पीक पक्षांसाठी सोडले शेतात

या लढाईत आंबेगाव तालुक्यातील गावडेवाडी येथील जयवंत गावडे या शेतकऱ्याने आपल्या २२ गुंठे शेतातील काढणीला आलेली बाजरी पक्षांसाठी राखली आहे. यातून परिसरातील पक्षी धान्य खात आहे.

पशू-पक्षी हे शेतकऱ्यांचे सोबती असतात आणि या लॉकडाऊनच्या काळात उन्हाच्या कडाक्यात पक्ष्यांच्या अन्नपाण्याची होरपळ होते. आता या पक्ष्यांचे शेतकरीच पालकत्व घेऊन त्यांच्या मदतीला धावले आहेत. शेतकरी आपल्या कुटुंबाला वर्षभर पुरेल येवढे धान्य पीकवतो. पण सध्या पक्षांची अन्नासाठी होणारी होरपळ पहून शेतकऱ्यांने पक्षांसाठी बाजरीचे संपूर्ण शेत सोडून दिलेली ही मदत कौतुकास्पद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.