जुन्नर (पुणे) - उन्हाच्या कडाक्यात माळरानावरील पक्षी अन्न पाण्यासाठी भटकंती करताा. या पक्ष्यांच्या अन्नासाठी जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील शेतकरी कुटुंब पुढे आले आहे. दोन एकर शेतातील काढणीला आलेली ज्वारी पक्ष्यांसाठी राखून ठेवली असून अनेक पक्षी या शेतात येऊन आपली भूक भागवत आहे.
जुन्नर तालुक्यातील पिंपरी पेंढार येथील शेतकरी नितीन शेलार यांनी मागीलवर्षी माळरानावर शेती तयार केली. त्यावेळी पक्षी माळरानावर वास्वव्यास होते. त्यामुळे पक्ष्यांना सध्या अन्न-पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये यासाठी ज्योती व नितीन शेलार या कुटुंबाने पक्ष्यांसाठी काढणीला आलेले ज्वारीचे पिक राखून ठेवले. त्याचबरोबर शेताजवळ पाण्याचीही व्यवस्था केली आहे. माळरानावर पक्ष्यांना धान्य उपलब्ध झाल्याने पक्ष्यांची अन्न-पाण्याची भटकंती थांबली आहे.
...म्हणून राबवताहेत उपक्रम
शेलार दाम्पत्यांनी वर्षभरापूर्वी या माळरानावर स्वच्छता केली होती. त्यावेळी अनेक पक्ष्यांना हानी पोहोचली. यामुळे त्यांनी निसर्गाची परतफेड करण्यासाठी हा उपक्रम हाती घेतला आहे.
हेही वाचा - पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये डेटिंग अॅपवरून 16 तरुणांना गंडा घालणारी तरुणी गजाआड