ETV Bharat / state

Pune Crime News : प्रेयसीला खुश करण्यासाठी बनला बनावट पोलीस, चतुशृंगी पोलिसांकडून आरोपीला अटक - Fake Police in Pune

प्रेम मिळवण्यासाठी कोणी काय करेल हे सांगता येत नाही. पुण्यात असाच एक प्रियकर समोर आला आहे. ज्याने प्रेयसीसाठी वेगळीच शक्कल लढवली आहे. प्रेयसीला खुश करण्यासाठी या तरुणाने स्वतःच बनावट पोलीस बनून फिरत होता. पुण्यातील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या औंध भागांमध्ये हा फिरत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Fake Police in Pune
प्रेयसीला खुश करण्यासाठी बनला बनावट पोलीस
author img

By

Published : May 2, 2023, 1:19 PM IST

पुणे : याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यतील चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने औंध परिसरात एका बनावट पोलिस शिपायाला पकडले आहे. प्रेयसीला खुश करण्यासाठी पुण्यातील तरुण बनावट पोलीस शिपाई बनला होता. यशवंत रमेश धुरी असे बनावट पोलीस शिपायाचे नाव आहे.

पोलीस शिपायाचा गणवेश परिधान केला : चतुशृंगी पोलीस स्टेशनच्या तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक निलेश कुमार महाडिक हे पथकासह औंध परिसरात गस्त घालत असताना एक तरुण पोलीस शिपायाचा गणवेश परिधान केलेला आढळला. पोलिसांनी त्या बनावट पोलिसाकडे चौकशी केली असता, त्याने आपण औंध पोलीस चौकीमध्ये पोलीस शिपाई पदावर कार्यरत असल्याचे सांगितले होते. औंध पोलीस चौकीच्या पोलीस अधिकाऱ्यांनाच हा बनावट पोलीस औंध पोलीस चौकीमध्ये कार्यरत असल्याचे सांगितल्याने पोलीस अधिकारीही काही काळ चक्रावले.

आरोपीला एका दिवसाची पोलीस कोठडी : आरोपी यशवंत रमेश धुरी याच्याकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याने असे प्रेयसीला इम्प्रेस करण्यासाठी केले आणि त्याला पोलीस होण्याची इच्छा असल्याने पोलिसांचा गणवेश परिधान केल्याचे आरोपीने कबूल केले आहे. पोलिसांनी त्याला कोर्टात हजर केले असता, त्याला एका दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपी यशवंत धुरीने काही गुन्हे केला आहे का याची माहिती आता पोलीस अधिकारी घेत आहेत.

पोलीस पुढील तपास करत आहेत : प्रेम आंधळ असतं परंतु प्रेमात आंधळा होणे या तरुणाला खूप महागात पडले आहे. कारण त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुद्धा न्यायालयाने दिलेली आहे. प्रेमासाठी काहीही करत असले तरी आपला बनावटपणा उघड होतोच. तो ज्या हद्दीत राहतो त्याच हद्दीतल्या अधिकाऱ्यांना मी पोलीस असल्याचे सांगत असल्याने हा तरुण लवकर सापडला. त्यामुळे प्रेमामध्ये सुद्धा आपण काय करतो याचे भान राखणे गरजेचे आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा : Gangster Tillu Killed In Tihar Jail : दिल्लीच्या तिहार कारागृहात पुन्हा गँगवार; कुख्यात गँगस्टर टिल्लू गोळीबारात ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.