ETV Bharat / state

National Handloom Day : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पुण्यात ओडिशातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन - राष्ट्रीय हातमाग दिन

7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन आहे. यानिमित्त पुण्यात ओडिशातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले. ओडिशाची सांस्कृतिक ओळख असलेल्या वस्तूंचे जतन करण्यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे.

exhibition of Odisha items
ओडिशातील वस्तूंचे प्रदर्शन
author img

By

Published : Aug 6, 2023, 8:23 PM IST

Updated : Aug 6, 2023, 10:04 PM IST

राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पुण्यात ओडिशातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन

पुणे : राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त पुण्यात वुमन्स ओडिया वर्ल्ड यांच्याद्वारे ओडिशातील वैशिष्ट्यपूर्ण वस्तूंचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या कोकणे चौकामध्ये हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात महिलांनी बनवलेल्या साड्यांपासून ते विविध घरगुती वस्तू मांडलेल्या आहेत.

ओडिशाची सांस्कृतिक ओळख असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन : ओडिशाची सांस्कृतिक ओळख असलेल्या वस्तूंचे जतन व्हावे आणि त्या कलाकारांना प्रसिद्धी मिळावी, यासाठी हे प्रदर्शन भरवण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. तसेच याद्वारे स्थानिक संस्कृती प्रकट व्हावी, हा या प्रदर्शनाचा उद्देश आहे.

प्रदर्शनात 100 पेक्षा अधिक महिलांनी भाग घेतला : 7 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिन आहे. त्यानिमित्त हे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. या प्रदर्शनात जवळपास 100 पेक्षा अधिक महिलांनी भाग घेतला, असे स्वाभिमानी ओडिया वुमन वर्ल्डच्या सेक्रेटरी शारदा प्रसन्न नाथ सांगितले. विणकर कलाकारांनी आणि व्यावसायिकांनी आजपर्यंत ही कला आणि हा व्यवसाय जिवंत ठेवलेला आहे. त्यांच्या या कार्याला आपण सर्वांनी हातभार लावला पाहिजे. त्यासाठी हे प्रदर्शन असल्याचे त्यांनी सांगितले.

हातमाग विणकरांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त महिला : भारत सरकारने दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस 'राष्ट्रीय हातमाग दिन' म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील हातमाग विणकरांचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि त्यांच्या कामाचा उत्सव साजरा करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. हातमाग विणकरांमध्ये 70 टक्क्यांपेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. त्यामुळे महिला सक्षमीकरणासाठी हा उद्योग आवश्यक आहे.

हातमाग दिनाचा इतिहास : 7 ऑगस्ट 1905 रोजी देशात स्वदेशी चळवळ सुरू झाली होती. देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात या चळवळीचे मोठे महत्व आहे. या चळवळीमुळे देशातील घराघरात खादी पोहचली होती. यामुळे हा दिवस 'राष्ट्रीय हातमाग दिन' म्हणून साजरा केला जातो. भारत सरकारने 2015 मध्ये हा दिन साजरा करण्याची घोषणा केली होती.

हे ही वाचा :

  1. National Sisters Day 2023 : प्रत्येक संकटात साथ देते बहिण, जाणून घ्या राष्ट्रीय भगिनी दिनाचा इतिहास...
  2. National Girlfriend Day 2023 : राष्ट्रीय गर्लफ्रेंड दिनानिमित्त, तुमच्या गर्लफ्रेंडला तिच्या राशीनुसार द्या खास भेटवस्तू ...
  3. National Heart Transplantation Day 2023 : राष्ट्रीय हृदय प्रत्यारोपण दिवस 2023; जाणून घ्या काय आहे या दिवसाचे महत्त्व...

Last Updated : Aug 6, 2023, 10:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.