ETV Bharat / state

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नव्या अराजकीय आघाडीची स्थापना - राजू शेट्टी यांची प्रजा लोकशाही परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 'प्रजा लोकशाही परिषद' या अराजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली आहे.  केंद्र आणि राज्यात असलेले सरकार सामान्य बहुजन वंचित ओबीसी वर्गाचे दमन करत आहे. या वर्गाचा आवाज कायम ठेवण्यासाठी आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परीषदेत स्पष्ट केले.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नव्या अराजकीय आघाडीची स्थापना
author img

By

Published : Sep 14, 2019, 7:32 PM IST

पुणे - स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली 'प्रजा लोकशाही परिषद' या अराजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. पुण्यामध्ये 15 ते 20 विविध संघटनांची बैठक होऊन ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे. 20 सप्टेंबरला पुण्यात या आघाडीची सभा होणार आहे. केंद्र आणि राज्यात असलेले सरकार सामान्य बहुजन वंचित ओबीसी वर्गाचे दमन करत आहे. या वर्गाचा आवाज कायम ठेवण्यासाठी आघाडीची स्थापना करण्यात आल्याचे राजू शेट्टी यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नव्या अराजकीय आघाडीची स्थापना

ही आघाडी अराजकीय आहे आणि या आघाडी मार्फत निवडणूक लढवली जाणार नाही. भाजप-सेना युती वगळता इतर समविचारी पक्षाशी बोलणी सुरू असून स्वाभिमानी तर्फेच निवडणूक लढवली जाईल, असे यावेळी राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले आहे. सरकार ईडीची चौकशी करून विरोधकांना भयभीत करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. कडकनाथ कोंबडी घोटाळ्याप्रकरणी मी स्वतः ईडीकडे गेलो होतो. ईडीने या प्रकरणात चौकशी केली नाही तर, ईडीवर मोर्चा काढणारा मी देशातला पहिला असेल, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला आहे.

हेही वाचा - शेतकऱ्यांनी कडकनाथ प्रकरणी केली तक्रार दाखल; मंत्री सदाभाऊ खोतांच्या मुलाचे नाव, पोलिसांचा 'यू टर्न'

'ही महाजनादेश नाही तर फसवी यात्रा', अशा शब्दात शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेवरही टीका केली आहे. भाजपमध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे यांना 'ही पूर्वीची वाजपेयी-मुंडेंची भाजप नाही तर मोदी-फडणवीस यांची भाजप आहे. त्यामुळे भाजपमध्ये जाऊ नका', असा सल्ला आपण दिला होता असा खुलासाही शेट्टी यांनी यावेळी केला.

Intro:राजू शेट्टीBody:mh_pun_05_raju_shetty_press_avb_7201348

Anchor
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये असलेले सरकार हे सामान्य बहुजन वंचित ओबीसी वर्गाचे दमन करत असून या वर्गाचा आवाज कायम ठेवण्यासाठी प्रजा लोकशाही परिषद या राजकीय आघाडीची स्थापना करण्यात आली असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली ही आघाडी काम करणार आहे ...पुण्यामध्ये 15 ते 20 विविध संघटनांची बैठक होऊन ही आघाडी स्थापण्यात आली आणि 20 सप्टेंबरला पुण्यात या आघाडीची सभा होणार आहे....ही आघाडी अराजकीय असून आघाडी मार्फत निवडणूक लढवली जाणार नाही मात्र भाजप सेना युती वगळता इतर समविचारी पक्षाशी आमची बोलणी सुरू असून स्वाभिमानी तर्फे निवडणूक लढवली जाईल असे यावेळी राजू शेट्टी यांनी सांगितले...मुख्यमंत्र्यांनी काढलेल्या महाजनादेश यात्रेवर ही राजू शेट्टी यांनी टीका केली जनतेचे खरे प्रश्न मांडले जात नाहीत ही महाजनादेश नाही तर फसवी यात्रा आहे असे शेट्टी म्हणाले, भाजप मध्ये प्रवेश केलेल्या उदयनराजे यांना भाजप मध्ये जाऊ नका ही पूर्वीची वाजपेयी मुंडेंची भाजप नाही तर मोदी फडणवीस यांची भाजप आहे मी त्यांच्यात जाऊन अनुभव घेऊन आलो आहे असे मी उदयनराजे यांना सांगितले होते असे शेट्टी म्हणाले....ईडी ची चौकशी करून विरोधकांना भयभीत करण्याचे काम हे सरकार करते आहे मी मात्र स्वतःच ईडी कडे गेलो होतो कडकनाथ कोंबडी घोटाळ्यात पोलीस केस दाखल झाल्या आता ईडीने त्याची चौकशी करावी अशी मागणी करण्यासाठी गेलो होतो असे राजू शेट्टी म्हणाले, ईडी ने या प्रकरणात चौकशी केली नाही तर ईडी वर देशातला पहिला मोर्चा काढणारा मी असेल असे देखील राजू शेट्टी यावेळी म्हणाले
Byte राजू शेट्टी, नेते, स्वाभिमानी शेतकरी संघटनाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.