बारामती - शहरासह, तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी होऊन रुग्णसंख्येत घट झाली असल्यामुळे प्रशासनाने निर्बंध शिथिल केले होते. मात्र तालुक्यातील आठ गावात दहा पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने बारामतीत आठ गावात अंशतः लॉकडाउन करण्यात आले आहेत. ग्रामीण भागात कुटुंब संसर्गाच्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे.
२४ जूनपासून पुढील सात दिवस अंशतः लॉकडाऊन -
बारामतीत आठ गावामध्ये वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपर्यंत घरातील एक किंवा दोन व्यक्ती बाधित होत असे, मात्र संस्थात्मक विलगीकरण कमी केल्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्य बाधित होत आहे. ही अतिशय चिंताजनक बाबसमोर आली आहे. २४ जूनपासून सात दिवस पुढील आदेश होईपर्यंत अंशतः लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अंशतः संचारबंदी करण्यात आली आहे. यामध्ये गावात खाजगी कोचिंग क्लासेस, आठवडी बाजार, धार्मिक, राजकीय, मंगल कार्यालय, मॉल, लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम पूर्णपणे बंद राहणार आहेत. केवळ मेडीकल, कृषि सेवा केंद्रे, किराणा दुकाने, दुध डेअरी सुरू राहणार आहेत.
हेही वाचा - आता मोफत तपासणी-औषधे, अजित पवारांच्या हस्ते मोबाइल क्लिनिक व्हॅनचे उद्घाटन