पुणे - पुण्यात शुक्रवारी कोरोनामुळे आठ दिवसाच्या बाळाचा मृत्यू झाला. या बाळावर 3 जुलैपासून पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास तिचा मृत्यू झाला. पुणे शहरात आतापर्यंत कोरोनामुळे 816 रुग्णांचा मृत्यू झाला. शनिवारी दिवसभरात (शनिवारी) पुणे शहरात कोरोनाचे 827 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 808 रुग्णांना डिस्चार्जही देण्यात आला. दिवसभरात 16 रुग्णांचा मृत्यू झाला. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 816 नागरिकांचा मृत्यू झाला.
आजपर्यंत पुण्यात एकूण कोरोनाची बाधा झालेले 26 हजार 904 रुग्ण सापडले. यातील उपचाराअंती बऱ्या झालेल्या 16 हजार 996 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. महापालिकेच्या विविध रुग्णालयात अजूनही 9 हजार 92 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यातील 461 रुग्ण गंभीर असून यातील 64 जण व्हेंटिलेटरवर आहेत.
राज्यातील कोरोना परिस्थिती -
राज्यात शनिवारी 8 हजार 139 कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. एकूण संख्या आता 2 लाख 46 हजार 600 अशी झाली आहे. शनिवारी नवीन 4 हजार 360 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 1 लाख 36 हजार 985 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 99 हजार 202 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.