ETV Bharat / state

#Covid19 ...अखेर पिंपरी-चिंचवडमधील पाच कोरोनामुक्त व्यक्तींना मिळाला डिस्चार्ज - pimpari chinchwad

पिपंरी चिंचवड शहरात १२ जण कोरोना बाधित होते. मात्र,डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे ८ जणांची कोरोनो टेस्ट निगेटिव्ह आली. कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

eight corona patient in pcmc recovered from corona virus
....अखेर पिंपरी-चिंचवडमधील पाच कोरोनामुक्त व्यक्तींना मिळाला डिस्चार्ज
author img

By

Published : Mar 29, 2020, 2:15 PM IST

पुणे- पिंपरी चिंचवड शहरातील पाच जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या दोन दिवसांत एकूण ८ जणांना घरी सोडण्यात आले असून सर्वांची प्रकृती उत्तम आहे. एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांना भोसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर एका थायलंड येथून आलेल्या तरुणावर ही त्याच रुग्णालयात उपचार केले असून १४ दिवसांच्या दोन टेस्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

#Covid19....अखेर पिंपरी-चिंचवडमधील पाच कोरोनामुक्त व्यक्तींना मिळाला डिस्चार्ज

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना बाधितांचा संख्या १२ आहे. यापैकी ८ जणांना घरी सोडण्यात आले. यावेळी डॉक्टर,आरोग्य कर्मचारी, पोलीस यांनी टाळ्या वाजवून कोरोनामुक्त व्यक्तींचा उत्साह वाढवत डॉक्टरांचे कौतुक केले आहे. शहरात १२ जण करोना बाधित होते. मात्र,डॉक्टरांनी केलेल्या उपचारामुळे ८ जण कोरोनामुक्त झालेले असून बरे झाले आहेत.

हेही वाचा-कोरोना विरोधातील लढ्याला टाटा ट्रस्टची 500 कोटींची मदत

दुबईहून आलेला तरुणामुळे कुटुंबातील चार जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली होती. यात दोन महिला, १२ वर्षांची मुलगी आणि मुलगा आहे. त्यांच्यावर भोसरी येथील नूतन रुग्णालयात उपचार सुरू केले. थायलंड येथून परतलेल्या तरुणाला देखील कोरोना विषाणूची बाधा झाली. या सर्वांवर १४ दिवसांच्या उपचारानंतर पाच ही जणांची टेस्ट ही निगेटिव्ह आली आहे. कोरोनामुक्त झालेल्या पाच जणांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.