ETV Bharat / state

डीएसके तब्बल अडीच वर्षानंतर येणार तुरुंगाबाहेर; मुलीच्या तेराव्याला जाण्यास न्यायालयाची परवानगी - dsk out of jail pune news

ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यवसाय दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांचे कुटुंबीय तब्बल अडीच वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. न्यायालयाने त्यांना मुलीच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

अडीच वर्षानंतर डीएसके तुरुंगाबाहेर येणार

author img

By

Published : Aug 11, 2020, 10:39 PM IST

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तुरुंगात असलेले बांधकाम व्यवसाय दीपक सखाराम कुलकर्णी (डीएसके) आणि त्यांचे कुटुंबीय तब्बल अडीच वर्षांनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहेत. न्यायालयाने त्यांना मुलीच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी परवानगी दिली आहे. सत्र न्यायाधीश जे. एन. राजे यांनी याबाबत आदेश दिले आहेत.

डीएसके यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांचा काही दिवसांपूर्वी आजारपणाने मृत्यू झाला आहे. त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. त्यांच्या अंत्यविधीला हजर राहता न आल्याने तेराव्याला जाण्याची परवानगी मिळावी, असा अर्ज डीएसके, त्यांची पत्नी हेमंती कुलकर्णी आणि मुलगा शिरीष कुलकर्णी यांनी केला होता. तो मान्य करत न्यायालयाने 16 ऑगस्ट रोजी होणाऱ्या तेराव्याच्या कार्यक्रमाला काही तास हजर होण्यास तिघांनाही परवानगी दिली आहे. डीएसके आणि कुटुंबीय तुरुंगातून बाहेर पडल्यापासून पुन्हा कारागृहात येईपर्यंत पोलिसांचे पथक त्यांच्याबरोबर असणार आहे. तसेच त्यांनी कोरोना विषयक सर्व खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे निर्देशही न्यायालयाने आदेशात दिले आहे.

दरम्यान, डीएसके व कुटुंबीयासह आणखी काही आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. तर, डीएसके यांचे बंधू मकरंद कुलकर्णी यांना काही दिवसांपूर्वीच या प्रकरणी जामीन मिळाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.