ETV Bharat / state

मद्यधुंद पर्यटकाला सेल्फी काढणे पडले महागात; पाय घसरून पडला दरीत

author img

By

Published : Aug 1, 2019, 6:59 PM IST

Updated : Aug 1, 2019, 7:22 PM IST

मद्यपान केल्याने निलेशचा पाय घसरून तो दरीत पडला. दोरीच्या मदतीने मानवी साखळी बनवून त्याच्या हातात दोरी देण्यात आली; मात्र....

सेल्फीच्या काढण्याच्या नादात पर्यटक ७० फूट दरीत खाली गेला.

लोणावळा - मद्यधुंद अवस्थेत असणाऱ्या पर्यटकाला सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले आहे. सेल्फीच्या काढण्याच्या नादात हा पर्यटक ७० फूट दरीत खाली गेला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जीव धोक्यात घालून संबंधित व्यक्तीला सुखरूप बाहेर काढले. निलेश भागवत असे बचावलेल्या पर्यटकाचे नाव असून, लोणावळ्याच्या लायन्स पॉईंट येथे मित्रांसोबत फिरायला गेला होता.

यावेळी त्याने ५०० फूट खोल दरीजवळ सेल्फी काढण्याचे धाडस केले. परंतू, मद्यपान केल्याने निलेशचा पाय घसरून तो दरीत पडला. नशीब बलवत्तर असल्याने ७० फुटावर तो झाडात अडकला. संबंधित घटनेची माहिती गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी मयूर अबनावे, हणमंत शिंदे, होमगार्ड शुभम कराळे आणि गणेश गाडे हे घटनास्थळी धाव घेऊन दोरीच्या साहाय्याने निलेशला वर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. दोरीच्या मदतीने मानवी साखळी बनवून निलेशला हातात दोरी देण्यात आली; मात्र तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने प्रतिक्रिया देत नव्हता. अखेर पोलीस दरीत उतरले. त्याच्या कंबरेला दोरी बांधून ३० मिनिटांच्या प्रयत्नानंतर त्याला वर काढण्यात आले.

सेल्फीच्या काढण्याच्या नादात पर्यटक ७० फूट दरीत खाली गेला.

सध्या पावसाळ्यामुळे लोणावळ्यातील भुशी धरण, लायन्स पॉइंट येथे पर्यटकांची गर्दी वाढत आहे. मात्र, पर्यटक सुरक्षिततेची कोणतीही काळजी घेत नसल्याने अशा घटना घडत आहेत.

Intro:mh_pun_02_tourist_av_10002Body:mh_pun_02_tourist_av_10002

Anchor:- मद्यधुंद अवस्थेत असलेल्या पर्यटकाला सेल्फी काढणे चांगलेच महागात पडले आहे. पर्यटक ७० फूट खोल दरीत खाली गेला. परंतु, लोणावळा ग्रामीण पोलिसांनी जीव धोक्यात घालून त्याला सुखरूप बाहेर काढले आहे. निलेश भागवत असे सुखरूप वर काढलेल्या पर्यटकाचे नाव आहे. लायन्स पॉईंट येथे मद्यधुंद निलेश आणि मित्र हे फिरायला गेले होते. तेव्हा मद्यधुंद असलेल्या निलेश ने ५०० फूट खोल दरी जवळ सेल्फी काढण्याचे धाडस केले. त्यावेळी निलेश चा पाय घसरून तो दरीत पडला. नशीब बलवत्तर असल्याने ७० फुटावर तो झाडाला लटकला. या घटनेची माहिती गस्तीवर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याना देण्यात आली. यावेळी पोलीस कर्मचारी मयूर अबनावे, हणमंत शिंदे, हुसेन कुवर,होमगार्ड शुभम कराळे आणि गणेश गाडे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दोरीच्या साहाय्याने निलेश ला वर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. दोरीच्या मदतीने मानवी साखळी बनवत हुसेन आणि शिंदे हे ७० फूट खोल दरीत जीवाची परवा न करता खाली उतरले. निलेश ला हातात दोरी देण्यात आली मात्र तो मद्यधुंद अवस्थेत असल्याने त्याला काहीच समजत नव्हते. अखेर हुसेन यांनी अधिक खाली जाऊन निलेश च्या कंबरेला दोरी बांधून ३० मिनिटांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला वर काढण्यात आले. दरम्यान, भुशी धरण, घुबड तलाव, आणि आगा लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीतील लायन्स पॉईंट येथील या घटनेत पोलिसांनी आपला जीवाची परवा न करता पर्यटकांची प्राण वाचविले आहेत. मात्र यातून पर्यटक चांगला बोध घेताना दिसत नाहीत. ते घोड चूक परत परत करता दिसत आहेतConclusion:
Last Updated : Aug 1, 2019, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.