पिंपरी-चिंचवड (पुणे) - जुना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथील उड्डाणपुलावर मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप आल्याने वाहन चालकांना कसरत करावी लागते आहे.
जुना पुणे-मुंबई महामार्गावरील देहूरोड येथे वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी फेब्रुवारी 2019 मध्ये युतीच्या सरकार ने उड्डाण पूल उभारण्यात आला. हा पूल पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना सोयीचे ठरले. पण, उड्डाण पूल उभारत असताना काही चुका झाल्याचे पावसाळ्यात उघड झाले आहे. आज (दि. 19 सप्टें.) सकाळपासूनच देहूरोड परिसरात दमदार पाऊस झाल्याने उड्डाण पुलावर नागमोडी वळणाच्या नदीचे स्वरूप आले होते. पाण्याला जाण्यास वाट नसल्याने पुलावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले. यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पूल उभारण्यात आला असला तरी पावसाळ्यात मात्र पाणी साचल्याने वाहनाची रांग लागल्याचे पाहायला मिळत आहे. या सर्व प्रकारामुळे वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे, अशी मागणी वाहनचालक करत आहेत.
हेही वाचा - कोरोनाबाधित पतीच्या मृत्यूनंतर खचलेल्या पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या