ETV Bharat / state

पुणेकरांची दिवाळीतील सोने खरेदी 100 कोटी पार; पाहा खास रिपोर्ट - Pune Citizens Crosses 100 Crores

दिवाळी म्हणलं की सोने खरेदी आलीच. मात्र, या सोने खरेदीचाही उच्चांक व्हावा अस हे चित्र पुण्यात पाहायला मिळाले आहे. यावर्षी पुण्यात लोकांची सोने-चांदी खरेदी सुमारे 100 कोटींच्या वर गेली आहे.

सोन्या-चांदीचे दुकान
सोन्या-चांदीचे दुकान
author img

By

Published : Oct 26, 2022, 6:19 PM IST

पुणे - साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडवा निमित्त अनेकजण सोनं खरेदी करतात. हिंदू धर्मीयांसाठी महत्त्वाच्या दिवशी सोनं खरेदी करणं हे शुभ मानलं जातं. मग दिवाळीच्या दिवसात आज दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात सोने खरेदी करण्यात आली आहे.यंदाच्या दिवाळीत शहरात अंदाजे 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त सोने खरेदी झाली असून यंदाची दिवाळी ही सोने चांदी व्यापाऱ्यांसाठी गोड झाली आहे.

सोने खरेदीबाबदचा खार रिपोर्ट

गेली दोन वर्ष कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सण उत्सव निर्बंध मध्ये साजरी झाले.अनेकांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले झाले.यंदा मात्र निर्बंध मुक्त असल्याने मोठ्या उत्साहात सण उत्सव साजरे होत आहे.यंदाच्या दिवाळीत सराफ व्यवसायिकांसाठी अच्छे दिन आले असून ऐन दिवाळीत सोन्याचे भाव घटल्याने नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर सोने खरेदी केले जात आहे. सोने-चांदीचे भाव कमी झाल्यामुळे दिवाळीच्या निमित्ताने सराफ बाजारपेठांमध्ये सोन्याच्या दागिन्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जात आहे.सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेकजण ही खरेदी करत आहेत.

सोन्या-चांदीचे दुकान
सोन्या-चांदीचे दुकान

आज पाडव्याच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणावर नागरिकांकडून सोने चांदी खरेदी केली जात आहे.मागील दोन वर्ष कोरोनाने जी खरेदी झाली नव्हती ती खरेदी यंदाच्या या पाडव्याच्या महूर्त वर नागरिक करत आहे.किरकोळ बाजारात २२ कॅरेट सोने ४७ हजार ६३० आणि २४ कॅरेट सोने ५० हजार ७७० प्रति १० ग्रॅम होते. त्याचबरोबर चांदी ५८ हजार २०० रुपये किलो होती.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर सोने चांदीची खरेदी करण्यात आली आहे.सोन्याचे भाव कमी झाल्यामुळे नागरिकही सोन्याची खरेदी करत असून गुंतवणुकीवर भर देत आहेत. भारतामध्ये सध्या तरी मंदीचे वातावरण नाही, त्यामुळे ग्राहकांना संधी मिळाली असून उत्साहाने सोने खरेदी करत आहेत. त्यामुळे बाजारात चांगली स्थिरता असून खरेदीला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सोन्या-चांदीचे दुकान
सोन्या-चांदीचे दुकान

गेली दोन वर्ष कोविडमुळे सर्वानाच मोठा आर्थिक नुकसान सहन करावा लागला होता.यंदा मात्र निर्बंध मुक्त आणि उत्साहाच्या वातावरणात दिवाळी सण साजरा होत असल्याने शहरात यंदाच्या दिवाळीत अंदाजे 100 कोटी पेक्षा जास्त किंमतीची सोने खरेदी पुणेकर नागरिकांनी केली आहे.अशी माहिती यावेळी योगेंद्र डी अष्टेकर अँड कंपनीचे मालक योगेंद्र अष्टेकर यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.