ETV Bharat / state

पिंपरी चिंचवडमधील 'कोविड 19 वॉर रूम'च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकरांकडून कौतुक - pimpri chinchwad covid 19

गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती घेऊन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करताना विशेष दक्षता घ्यावी, असे सांगितले. गृह विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या जीपीएस ट्रॅकिंगवर भर द्यावा, असे सांगून संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

Divisional Commissioner Mhaisekar
पिंपरी चिंचवडमधील 'कोविड 19 वॉर रुम' च्या कामकाजाचे विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकरांकडून कौतुक
author img

By

Published : May 13, 2020, 8:22 PM IST

पुणे - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या 'कोविड 19 वॉर रूम' ला आज विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी भेट देऊन येथील कामकाजाची पाहणी केली. येथून होत असलेल्या कामाचे कौतुक केले. कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने विविध उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत डॉ. म्हैसेकर यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करुन त्यांना यावेळी सूचना केल्या.

यावेळी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अजित पवार, संतोष पाटील, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय तसेच महापालिकेतील संबधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिकेच्या 'कोविड 19 वॉर रूम' मधून होणाऱ्या कामाचे कौतुक करून महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेले कोविड केअर सेंटर (सीसीसी), डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर (डीसीएचसी), डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल (डीसीएच)मध्ये आजवर वैद्यकीय सुविधा घेतलेल्या नागरिकांची संख्यात्मक माहिती डॉ. म्हैसेकर यांनी घेतली.

गृह विलगीकरण व संस्थात्मक विलगीकरणाबाबत डॉ. म्हैसेकर यांनी माहिती घेऊन परदेशातून आलेल्या प्रवाशांचे संस्थात्मक विलगीकरण करताना विशेष दक्षता घ्यावी, असे सांगितले. गृह विलगीकरण केलेल्या नागरिकांच्या जीपीएस ट्रॅकिंगवर भर द्यावा, असे सांगून संस्थात्मक विलगीकरणाची क्षमता वाढविण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी फ्लू सेंटर मध्ये तपासणी केलेले रुग्ण, कोविड केअर सेंटर, कोविड हॉस्पीटल येथील खाटांची व्यवस्था, महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या स्वॅब तपासणीसाठी आतापर्यंत घेण्यात आलेले सॅम्पल, त्यातील पॉझिटीव्ह, निगेटिव्ह, प्रलंबित सॅम्पलची संख्या, आतापर्यंतचे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह व मृत रुग्ण, दैनंदिन वाढत जाणाऱ्या केसेस, कोविड-19 बाबत जनजागृतीसाठी महापालिकेच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना, स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेली निवारा केंद्रे. याबाबत श्रावण हर्डीकर यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच कोरोना विषयक कामासाठी जवळपास दोन हजार स्वयंसेवकांची नोंदणी झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.