ETV Bharat / state

बारामती शहरातील डिस्ट्रिब्यूशन बॉक्स धोकादायक

शहरातील अनेक ठिकाणच्या डिस्ट्रिब्यूशन बॉक्सची दुरावस्था झाली आहे. या बॉक्सवर अनेक व्यवसायिक जाहिरात लावत आहे. अन्य काही तांत्रिक कारणामुळे बॉक्स गरम झाल्यास बॉक्सला आग लागण्याचा शक्यता आहे.

डिस्ट्रिब्यूशन बॉक्स
डिस्ट्रिब्यूशन बॉक्स
author img

By

Published : Dec 26, 2020, 9:38 PM IST

बारामती – उच्च दाब विदयुत वाहिन्या आणि ग्राहक यांच्यातील मुख्य दुवा म्हणजे जागोजागी दिसणारे रोहित्र व डिस्ट्रिब्यूशन बॉक्स. मात्र बारामती शहरात अनेक ठिकाणचे डिस्ट्रिब्यूशन बॉक्स धोकादायक असल्याचे पाहवयास मिळत आहे. या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची महावितरणाने वेळीच दुरुस्ती करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.

डिस्ट्रिब्यूशन बॉक्स
डिस्ट्रीब्यूशन बॉक्सकडे लक्ष देण्याची गरज-बारामती शहरात महावितरणाकडून घरोघरी विदयुत पुरवठा करण्यासाठी ठिकठिकाणी डिस्ट्रिब्यूशन बॉक्स व रोहित्र बसवण्यात आले आहेत. मात्र अनेक ठिकाणच्या डिस्ट्रिब्यूशन बॉक्स व रोहित्रांजवळ सुरक्षा जाळीमध्ये कचरा व झाडे उभी राहिली आहे. रोहित्र व डिस्ट्रिब्यूशन बॉक्सची योग्य ती देखरेख करण्याचे काम महावितरणकडे असते. रोहित्र व डिस्ट्रिब्यूशन बॉक्सबाबत धोकादायक परिस्थिती दाखवून दिले असता महावितरण कंपनीकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची दुरावस्था-शहरातील अनेक ठिकाणच्या डिस्ट्रिब्यूशन बॉक्सची दुरावस्था झाली आहे. या बॉक्सवर अनेक व्यवसायिक जाहिरात लावत आहे. अन्य काही तांत्रिक कारणामुळे बॉक्स गरम झाल्यास बॉक्सला आग लागण्याचा शक्यता आहे. त्यामुळे जिवित हानी होऊ शकते. त्यामुळे महावितरणाने शहरातील धोकादायक व मोडकळीस आलेल्या डिस्ट्रीब्यूशन बॉक्सची तात्काळ दुरुस्ती करून पूर्ववत करण्याची गरज निर्माण झाली आहे.वेळोवेळी ऑइल बदली करणे गरजेचे-हाय व्होल्टेज विजेच्या दाबावर नियंत्रण करण्याचे काम ट्रान्सफार्मर मधील ऑइलचे असते. सर्व इलेक्ट्रिक उपकरणांना नियंत्रित ठेवण्याचे काम ऑइल करत असल्याने हा रोहित्रांतील महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी दर तीन महिन्यांनी त्याची ब्रेक डाऊन व्हॅल्यू (बी.डी.व्हॅल्यू) तसेच ऑइलची पातळी तपासणे महत्त्वाचे आहे. परंतु, ऑइल तपासणीकडे कानाडोळा होत असल्याचे दिसते. जात असून, वर्षानुवर्षे रोहित्रांमध्ये तेच ऑइल असल्याने गरम झालेले ऑइल ट्रान्सफार्मरमधून बाहेर पडून पेट घेते. त्यातून आग लागण्यासह अपघाताच्या घटना घडण्याचा संभाव्य धोका आहे.

हेही वाचा- चंद्रकांतदादांचे विरोधक म्हणजे भाजप पक्षातीलच - सतेज पाटील

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.