ETV Bharat / state

Dilip Walse Patil : मी शरद पवारांना सोडून गेलो नाही, ते आमचे... - दिलीप वळसे पाटील - वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट

अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड केले होते. त्यानंतर शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यटच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे एकत्रित दिसले. तसेच या बैठकीत जयंत पाटील यांच्यासह राजेश टोपे हे देखील उपस्थित होते. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Dilip Walse Patil  Reaction
शरद पवार आणि दिलीप वळसे पाटील
author img

By

Published : Aug 12, 2023, 9:56 PM IST

प्रतिक्रिया देताना दिलीप वळसे पाटील

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन जुलै रोजी बंड झाले होते. अजित पवार यांनी शरद पवार यांची साथ सोडत शिवसेना, भाजप युतीच्या सरकारमध्ये सहभाग घेतला. शरद पवार यांचे विश्वासू समजले जाणारे दिलीप वळसे पाटील हे शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार गटात सहभागी झाले होते. शनिवारी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यटच्या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे पाटील हे एकत्रित दिसले. आम्ही शरद पवार यांना सोडून गेलेलो नाहीत, ते आमचे कालही नेते होते, उद्याही राहतील, अशी प्रतिक्रिया वळसे पाटील यांनी दिली आहे.

शरद पवार यांना सोडून गेलेलो नाही : आम्ही शरद पवार यांना सोडून गेलेलो नाहीत. शरद पवार हे आमचे कालही नेते होते आणि उद्याही राहतील, अशी प्रतिक्रिया दिलीप वळसे पाटील यांनी यावेळी दिली आहे. राष्ट्रीय साखर संघाच्यावतीने एक डेलिगेशन ब्राझीलला गेले होते. तिथे नवीन टेक्नॉलॉजी बघितल्यावर इथे कशा पद्धतीने ती घेता येईल याबाबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये काही तज्ञ लोकांनी एकत्र येत मार्गदर्शन केले आहे. आजच्या या बैठकीला अध्यक्ष शरद पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, तसेच राजेश टोपे उपस्थित होते.

मला पवारांनी थांबवले हे खरे आहे : राष्ट्रवादीच्या फुटीनंतर दिलीप वळसे पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती होती. मात्र, स्वतः शरद पवार यांनी वळसे पाटील यांना राजीनामा देण्यापासून थांबवले, तर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे काम करण्याचे देखील सांगितले. या चर्चांना स्वतः दिलीप वळसे पाटील यांनी दुजोरा दिला आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर दिलीप वळसे पाटील हे माध्यमांशी बोलताना म्हणाले की, हा वयक्तिक प्रश्न आहे. पण मला काम करायला सांगितले हे खरे आहे.

आज कोणतीही बैठक नव्हती : शनिवारी अजित पवारांनी व्हिएसआयला येणे टाळले का? यावर दिलीप वळसे पाटील म्हणाले की, कोणतीही बैठक नव्हती. आज फक्त परिसंवाद होता, यासाठी परदेशातील तज्ञ आले होते. राज्यातील साखर कारखानदार आले होते. यावेळी प्रश्न उत्तरेही झाली. आज शासकीय आणि हा असे दोन कार्यक्रम होते. त्यामुळे तिकडे अजित पवार गेले आणि येथे मी आलो, असे यावेळी पाटील म्हणाले.

खासगी चर्चा जाहीरपणे सांगता येत नाही : शरद पवारांसमोर आल्यावर अवघडल्यासारखे झाले का? यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की, अवघडलेपणा असण्याचे काही कारण नाही. आमच्यातला संवाद हा व्हिएसआयच्या संदर्भातील आणि भविष्यातील योजनांबद्दल होता. साहेबांचे माझ्याबद्दल रोष असण्याचे कारण नाही. खासगी चर्चा जाहीरपणे सांगता येत नाही, असे देखील यावेळी पवार म्हणाले.

नावात काय असते : मोदी-शाहांचा भाषणात उल्लेख करणे आता तुम्हाला बंधनकारक असेल? या प्रश्नावर वळसे पाटील म्हणाले की, गेली 30-35 वर्षे आम्ही सार्वजनिक आणि राजकीय कार्यक्रमात असतो. तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येकाचे नाव घ्यावे लागते. नावात काय असते, असे देखील यावेळी वळसे पाटील म्हणाले.

न्यायालयीन निर्णय आहे : तुम्ही सत्तेत आलात म्हणून नवाब मालिकांना जामीन मिळाला अशी चर्चा आहे. यावर वळसे पाटील म्हणाले की, नवाब मलिक बाहेर आले हा एक न्यायालयीन निर्णय आहे. आमच्या भूमिकेमुळे घडले असे म्हणणे चुकीचे आहे. ते कोणासोबत याबाबत बोलणे आता अयोग्य आहे. बाहेर सुरू असणाऱ्या चर्चांना काही अर्थ नसतो, असे देखील यावेळी वळसे पाटील म्हणाले.

हेही वाचा -

  1. Dilip Walse Patil On Abdul Sattar : कृषीमंत्र्यांना अजिबात गांभीर्य नाही, अब्दुल सत्तारांवर बरसले दिलीप वळसे पाटील
  2. Portfolio Allocation : खाते वाटपाचा तिढा सुटला! कही खुशी, तर कही गम ; कोणाला मिळाले कोणते खाते, जाणून घ्या
  3. Dilip Valse Patil: अजित पवारांच्या गटात सामील होण्यामागे दिलीप वळसे पाटलांनी सांगितले 'हे' कारण...

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.