ETV Bharat / state

बारामती आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल; संपामुळे प्रवाशांमध्ये नाराजी - etv bharat live

कालपासूनच बारामती आगारातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बारामती आगारातून एकही लालपरी रस्त्यावर दिसली नाही. बारामती व एमआयडीसी आगारात जवळपास १२० बसेस असून २५० चालक व २२० वाहक आहेत. या माध्यमातून बारामती आगार दररोज १२ हजारांहून अधिक प्रवाशांची राज्यभरात ने-आण करत असते.

बारामती आगार
बारामती आगार
author img

By

Published : Nov 9, 2021, 12:36 PM IST

बारामती - राज्यभरातील राज्य परिवहन मंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी एसटी मंडळाच्या चालक, वाहक, यांत्रिक, परिवेक्षक आदी कर्मचाऱ्यांनी मागील सुमारे दोन आठवड्यापासून संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यभरात सुरू असलेल्या या संपामध्ये बारामती आगार, विभागीय कार्यशाळा बारामती व एमआयडीसी आगार या तिन्ही विभागाने पाठिंबा दर्शविला असून संपात सहभागी झाले आहेत.

बारामती आगारातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे हाल

कालपासूनच बारामती आगारातील सर्व कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. त्यामुळे बारामती आगारातून एकही लालपरी रस्त्यावर दिसली नाही. बारामती व एमआयडीसी आगारात जवळपास १२० बसेस असून २५० चालक व २२० वाहक आहेत. या माध्यमातून बारामती आगार दररोज १२ हजारांहून अधिक प्रवाशांची राज्यभरात ने-आण करत असते. सर्वसामान्यांना परवडणारा प्रवास म्हणून लालपरीकडे पाहिले जाते. मात्र कालपासून तिची चाके स्तब्द झाल्याने प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे.

दिवाळीसाठी पुण्याहून बारामतीला आले होते. सन साजरा करुन पुण्याकडे घरी जायचे आहे. मात्र दोन दिवसांपासून एसटी बंद असल्यामुळे मी माझ्या लहान मुलासह येथे अडकून पडली आहे. आई आजारी आहे तिला दवाखान्यात घेऊन जायचे आहे. मात्र बस बंद असल्याने माझ्यासमोर प्रश्न निर्माण झाला आहे. खाजगी वाहनाचे प्रवास भाडे परवडत नाही. त्यामुळे लवकरात लवकर एसटी सुरू करण्यात यावी..अशी अपेक्षा नेहा शेलार व प्रियंका आवाडे या महिला प्रवाशांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.