पुणे पुण्यामधील अध्यात्मिक गुरु ओशो यांचा आश्रम आणि समाधी आहे. त्या ठिकाणी ट्रस्टी आणि भक्तांमध्ये जागेवरून अनेक दिवसांपासून वाद सुरू आहेत. हे प्रकरण उच्च न्यायालयात पोचले आहे. समाधीच्या ठिकाणी आम्हाला जाऊ देत नसल्याचे आरोप भक्तां मार्फत वारंवार केले जातात. उच्च न्यायालयाच्या आदेशची प्रत घेऊन भक्त आश्रमात येत असताना त्यांना आश्रमात येऊ दिले जात नाही असा आरोप आहे. त्या गटातीलच एक भक्त योगेश ठक्कर म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने 11 ऑगस्ट रोजी दिलेल्या निर्णयात आम्हाला आश्रमातील ओशो समाधीमध्ये प्रवेश करण्याची परवानगी दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत आम्ही प्रशासनाला आणि अगदी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यालाही दिली. पण तरीही आश्रमाच्या आवारात आम्हाला प्रवेश देण्यात आला नाही. आम्हाला सांगण्यात आले की ओशो समाधी फक्त दुपारी 1 वाजेपर्यंतच खुली आहे आणि आम्ही दुपारी 1 नंतर पोहोचलो होतो, योगेश ठक्कर यांनी गेल्या वर्षी आश्रमाच्या काही मालमत्तेची विल्हेवाट लावण्याच्या कथित प्रयत्नाबाबत न्यायालयात याचिका केली होती. ओशोंच्या शिष्यांना आश्रमात प्रवेश नाकारला जात असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले होते.
आपल्या निर्णयात न्यायालयाने म्हटले होते की, ओशो समाधीत भाविकांना प्रवेश करण्यास मनाई नाही. कायद्याच्या योग्य प्रक्रियेचे पालन न करता ट्रस्ट किंवा कोणताही पक्ष ट्रस्टच्या जंगम किंवा जंगम मालमत्तेच्या संदर्भात कोणतेही तृतीय-पक्षाचे हितसंबंध निर्माण करणार नाही. याचिकाकर्ते किंवा भाविकांना समाधीचे दर्शन घेण्यास मनाई नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. ओशो समाधीचे संरक्षण करण्याचे निर्देशही दिले आहेत. याचिकाकर्ते किंवा भक्त नक्कीच ओशो समाधीचे दर्शन घेऊ शकतात. रिसॉर्ट प्रशासनाने सांगितले की, शिष्यांनी प्रथम स्वतःची नोंदणी करण्याचा त्यांचा नियम पाळला नाही किंवा त्यांनी प्रवेश शुल्कही भरले नाही म्हणुन प्रवेश नाकारण्यात
हेही वाचा Mumbai Ganesh Mandals मुंबईत सार्वजनिक गणपती मंडळांच्या बाप्पांचे थाटात आगमन