ETV Bharat / state

Film Har Har Mahadev : हर हर महादेव चित्रपटाला वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचा विरोध, बजावणार कायदेशीर नोटीस

'हर हर महादेव' (Film Har Har Mahadev) या चित्रपटावरून वाद सुरू आहे. आत्ता या चित्रपटावर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी देखील आक्षेप नोंदविला असून लवकरच आम्ही याबाबत निर्माते दिग्दर्शक यांना नोटीस पाठवणार आहोत. असे रुपाली देशपांडे यांनी सांगितले (Descendants of Veer Bajiprabhu Deshpande opposed) आहे.

author img

By

Published : Nov 17, 2022, 8:11 AM IST

Film Har Har Mahadev
हर हर महादेव चित्रपटाला वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांचा विरोध

पुणे : गेल्या काही दिवसांपासून 'हर हर महादेव' (Film Har Har Mahadev) या चित्रपटावरून वाद सुरू आहे. मनसे कडून चित्रपटाला पाठिंबा दिला जात आहे, तर काहिंकडून आत्ता याला विरोध देखील होत आहे. आत्ता या चित्रपटावर वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशजांनी देखील आक्षेप नोंदविला असून लवकरच आम्ही याबाबत निर्माते दिग्दर्शक यांना नोटीस पाठवणार आहोत. असे यावेळी रुपाली देशपांडे यांनी सांगितले (Descendants of Veer Bajiprabhu Deshpande opposed) आहे. 'हर हर महादेव' या चित्रपटावर आक्षेप घेण्यासाठी वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या विषयी आज पत्रकार परिषद आयोजित केली होती, यावेळी ते बोलत होते.

प्रतिक्रिया देताना वीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या वंशज रुपाली देशपांडे

आक्षेप नोंदवला : वीर बाजीप्रभू देशपांडे हे हिरडस मावळ येथील शिंद या गावी राहत होते. तेथे सध्या राहणारे वंशज हे अमर वामनराव देशपांडे, किरण अमर देशपांडे, भोर आणि पुणे येथे स्थायिक असलेले त्यांच्या वंश कुटुंबीयांनी हर महादेव या चित्रपटाच्या संदर्भात आक्षेप नोंदवला आहे. हा विरोध ऐतिहासिक चित्रपटातील त्रुटीवर आहे इतिहास अभ्यासकांनी देखील यातील काही प्रसंगांवर आक्षेप घेतलेला आहे. सिनेमॅटिक लिबर्टी ही काल्पनिक गोष्टीमध्ये घेता येते, पण ऐतिहासिक घटनांमधे नाही. सिनेमॅटिक लिबर्टी पाना इतिहास बदलणे असा नक्कीच होत नाही, तसेच ऐतिहासिक घटनांचा क्रम बदलणे अनुचित आहे. ऐतिहासिक चित्रपट काढताना निर्माता, दिग्दर्शक, कलाकार तसेच इतिहास सल्लागार यांना खूप जबाबदारीने हे कार्य करावे लागते दुर्दैवाने या चित्रपटाच्या बाबतीत अनेक ऐतिहासिक संदर्भ नसलेल्या घटना यामध्ये दाखविलेल्या आहेत.

पराक्रम गाजवला : छत्रपती शिवाजी महाराज मुळातच हिरेपारखी होते. गुणग्राहकतेमुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. शिवाजी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडे यांना वरंधा घाटामध्ये जासलोलगड किंवा कासलीलगड हा किल्ला वसवण्याची जबाबदारी दिली होती व तसे पत्र उपलब्ध आहे. परंतु चित्रपटांमध्ये अनेक जागी देवळे बांधण्यात आली असा प्रसंग दाखवण्यात आला आहे. पन्हाळा लढाई म्हणले की, आपल्याला आठवते ते म्हणजे बांदल देशमुख, बाजीप्रभू देशपांडे (Veer Bajiprabhu Deshpande) आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांचे नाव, बाजीप्रभू यांनी बांदल देशमुख यांचे सैन्याचे नेतृत्व यांनी केले होते. बांदल सैन्याने या युद्धात मोठा पराक्रम गाजवला आणि राजांचे प्राण वाचवले.

ऐतिहासिक आधार : बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभू देशपांडे यांच्यामधील लहानपणीचा कटू प्रसंगांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही. या दोन्ही भावांनी स्वराज्यासाठी प्राणांची एकत्रित आहुती दिलेली आहे. अशा प्रसंगामुळे फुलाजी प्रभू यांची प्रतिमा मलिन होत आहे. चित्रपटांमध्ये शिरवळ येथील स्त्रियांचा जो बाजार दाखवलेला आहे. त्यासाठी सुद्धा, कोणता ऐतिहासिक संबंध घेतला होता, याचे दिग्दर्शक निर्मात्यांनी यांनी स्पष्टीकरण द्यावे. बाजीप्रभूच्या मृत्यूनंतर बाबाजी प्रभू यांना बाजीप्रभू यांच्या पश्चात सरदारी दिली व इतर सात मुलांना पालखीचा मान व तैनाती करून दिल्या. बाजीप्रभू देशपांडे हे अत्यंत पराक्रमी योद्धा होते हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. परंतु चित्रपटामध्ये अनेक वेळा ते भावनिक होताना दाखवलेले (Descendants of Veer Bajiprabhu Deshpande) आहेत.

कायदेशीर नोटीस बजावणार : चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच चित्रपट दाखवावा, अशी आम्ही कलाकार सुबोध भावे यांना व्हॉटसअप तसेच फेसबूकच्या माध्यमातून विनंती केली होती. निर्माता संपर्क साधतील असे सांगण्यातही आले होते. परंतु तसे झाले नाही. प्रदर्शनापूर्वी हा चित्रपट निदान इतिहास सल्लागारांना दाखवला होता का, हेसुद्धा महत्त्वाचे आहे. आत्ता जरी चित्रपट प्रदर्शित झाला असला तरी आम्ही याला कायदेशीर नोटीस बजावणार आहोत. असे देखील यावेळी देशपांडे यांनी (opposed the film Har Har Mahadev) सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.