ETV Bharat / state

Devendra Fadnavis on Kasba Chinchwad Election : कसबा, चिंचवड निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करणार - फडणवीस - प्रत्यक्ष भेटून मी चर्चा करणार

पुण्यातील कोथरूडमध्ये अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या दोन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. पुण्यात होऊ घातलेल्या कसबा पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी उमेदवार ठरत नाही यावर निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आवाहन करणार असल्याचे ते म्हणाले.

devendra fadnivis
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Feb 4, 2023, 8:44 AM IST

कसबा चिंचवडसाठी प्रत्यक्ष भेटून बिनविरोधसाठी आवाहन करणार

पुणे : सर्वच क्षेत्रातील व्यक्तींना मनःशांतीची गरज असते. तुम्ही इतके तास काम करत असता त्यामुळे तुम्हालाही मन: शांतीची गरज आहे. आपल्या सर्वांनाच मनशांतीची आवश्यकता आहे. त्यामुळेच ती घेण्यासाठी मीही आलो होतो. असे मनात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी आज श्री श्री रविशंकर यांच्या कार्यक्रमाला हजेरी लावली आहे. त्यानंतर त्याने माध्यमालाही प्रतिक्रिया दिली आहे.

मन: शांतीची गरज : पुण्यातील कोथरूडमध्ये अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या दोन दिवशीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील देखील उपस्थित होते. श्री श्री रविशंकर यांनी आध्यात्मिक कार्यासोबतच सामाजिक काम सुद्धा करत लोकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे काम केलेले आहे. सर्वांना मनशांतीची गरज आहे, त्यामुळे मी सुद्धा आज सहभागी झालो असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार : पुण्यात होऊ घातलेल्या कसबा, पिंपरी चिंचवड निवडणुकीसाठी उमेदवार ठरत नाही. यावर सुद्धा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मी प्रत्यक्ष भेटून विरोधी पक्षांनाही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करणार आहे असे, आवाहन केले. आमचे उमेदवार ठरतील, दिल्ली कार्यालयातून यांची घोषणा होईल असे यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस म्हणाले.

प्रत्यक्ष भेटून मी चर्चा करणार : त्यामुळे सर्वांना निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आवाहन करणार आहोत. याआधीही मी तसे आवाहन केले आहे. यानंतर प्रत्यक्ष जाऊन मी चर्चा ही करणार आहे. त्यामुळे बिनविरोध करण्यासाठी आमचा पूर्ण प्रयत्न असणार आहे. उमेदवारी घोषित झाले की नक्की कळेल उमेदवार कोण आहे. असे म्हणत त्याने कसबा पिंपरी चिंचवड मधील उमेदवाराचा सस्पेन्स मात्र कायम ठेवला आहे.

नागपूरची जागा हातची गेली : नागपूर शिक्षक मतदारसंघातील समर्थन दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे भाजपला धक्का बसला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्याशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री सुधीर मुनगंटीवार अशा दिग्गज नेत्यांचीही नागपूरची जागा हातची गेली. पाच जागांपैकी भाजप- १, राष्ट्रवादी १, अपक्ष १, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ (मविआ समर्थित) १ अशा जागांवर सर्व पक्ष निवडणू आले

हेही वाचा : Panna Tiger Reserve : पन्ना व्याघ्र प्रकल्पातून आनंदाची बातमी!, वाघिणीने दिला 4 पिल्लांना जन्म

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.