पिंपरी चिंचवड (पुणे) - कोरोनाच्या काळात राजकारण करू नये, असे आवाहन करत असताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवडच्या भाजपाच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना अप्रत्यक्षरीत्या कानपिचक्या दिल्या आहेत. महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचा नामोल्लेख केला नाही. याचा संदर्भ देत ते अनावधानाने झाले असेल, असे सांगत अजित पवार यांनी महापौरांना सावरून घेतले.
ते पिंपरी-चिंचवड शहरातील जम्बो कोविड सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ऑनलाईन नागरिकांशी संवाद साधत होते. यावेळी अनेक मान्यवरांसह कार्यकर्त्यांसह उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, कोरोनाच्या लढाईत कुठल्याही प्रकारचे राजकारण न आणता ही लढाई जिंकायचीच त्याच उद्देशाने सर्वजण कामाला लागले आहेत. महापौर आणि इतरांचे मनापासून आभार मानतो. महापौर माई ढोरे आपण सुरुवातीला भाषण केले. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे नाव घेतले नाही. मला वाटले माई नाराज झाल्या. पण, अनावधानाने राहिले असेल हरकत नाही, असे म्हणत अजित पवार यांनी महापौर यांना सावरून घेतले. पुढे ते म्हणाले की, करोना विषाणुला आपण दूर ठेवले पाहिजे, तसेच वैयक्तिक आणि सामाजिक स्वच्छता ठेवली पाहिजे, प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन नागरिकाने करावे, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या भाजपा महापौरांना अजित पवारांच्या कानपिचक्या - mayor usha dhore
महापौर उषा उर्फ माई ढोरे यांनी त्यांच्या भाषणात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांचा नामोल्लेख केला नाही. यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महापौरांना अप्रत्यक्षपणे कानपिचक्या दिल्या.