ETV Bharat / state

'अण्णा हजारे भूमिकेशी ठाम, सहसा मागे हटत नाहीत हा आजवरचा अनुभव' - पुणे अजित पवारांचे अण्णा हजारेंबद्दल वक्तव्य

'अण्णा हजारे आपल्या मताशी ठाम असतात. कुठे अन्याय होत असेल, चुका होत असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांनी आजवर अनेक आंदोलन केली आहेत. तशीच भूमिका त्यांनी आजही मांडली आहे. एकदा त्यांनी ठरवल्यानंतर ते सहसा मागे हटत नाहीत, त्यांच्या मतांशी ते ठाम राहतात, हा आजवरचा अनुभव आहे,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार न्यूज
पुणे उपमुख्यमंत्री अजित पवार न्यूज
author img

By

Published : Jan 29, 2021, 1:21 PM IST

पुणे - 'अण्णा हजारे आपल्या मताशी ठाम असतात. कुठे अन्याय होत असेल, चुका होत असतील तर त्या चुका दुरुस्त करण्यासाठी त्यांनी आजवर अनेक आंदोलन केली आहेत. तशीच भूमिका त्यांनी आजही मांडली आहे. एकदा त्यांनी ठरवल्यानंतर ते सहसा मागे हटत नाहीत, त्यांच्या मतांशी ते ठाम राहतात, हा आजवरचा अनुभव आहे,' असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. ते पुण्यात जिल्हा परिषद येथे राज्य गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमासाठी आले होते. कार्यक्रमानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

'अण्णा हजारे भूमिकेशी ठाम, सहसा मागे हटत नाहीत हा आजवरचा अनुभव'

हेही वाचा - पेट्रोलच्या दराने शंभरी पार केली तर आश्चर्य वाटून घेऊ नका; पवारांचा टोला

शेती कायद्यांविरोधातील आंदोलनाबद्दल अजित पवार म्हणाले

'दिल्लीत झालेल्या शेतकऱ्यांच्या रॅलीला एका भागात गालबोट लागले आहे. वास्तविक पाहता शेतकरी इतके महिने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते. ट्रॅक्टर हे त्यांचे शेतीचे महत्त्वाचे अवजार आहे. त्यामुळे ते ट्रॅक्टर घेऊन गेले होते. खरे पाहता शेतकरी कधीही ही हिंसाचाराचा अवलंब करीत नाहीत. त्यामुळे हा हिंसाचार कशामुळे घडला त्याच्या खोलात गेले पाहिजे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाला गालबोट लावून बदनाम करण्याचा प्रयत्न होता का, अशी शंका याठिकाणी निर्माण होते. मी स्वतः शेतकरी आहे, त्यामुळे मला खात्री आहे की शेतकरी हिंसाचाराची भूमिका कधीच घेत नाही. हिंसेच्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न शेतकरी कधीच करत नाही. आजपर्यंत अहिंसेच्या मार्गानेच आपल्या मागण्या पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला आहे,' असे पवार म्हणाले.

पवार यांचा केंद्र सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

'राज्यकर्त्यांनी कायद्याचा आधार घेऊन शेतकऱ्यांचा आंदोलन बदनाम करण्याचा अथवा थांबवण्याचा प्रयत्न करू नये. आपल्यावर अन्याय होत असेल तर अहिंसेच्या मार्गाने वाचा फोडण्याची शिकवण महात्मा गांधी आपल्याला दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबद्दल सरकारच्या मनात नेमके काय आहे हे कळत नाही. चर्चेच्या पहिल्या दहा-पंधरा फेऱ्या निष्फळ ठरत असतील तर शेतकऱ्यांना खेळत ठेवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा दिसतो. परंतु काहीही झाले तरी शेतकरी सरकारसमोर झुकणार नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा देणारा समाजही झुकणार नाही, ही बाब केंद्र सरकारने ध्यानात घ्यावी,' असे म्हणत त्यांनी केंद्रातील भाजप सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.

'महाराष्ट्रातही महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेईल, शेतकऱ्यांवर अन्याय होईल अशा गोष्टींना आम्ही अजिबात थारा देणार नाही. त्यामुळे शेतकरी कायदे राज्यात लागू करण्याचा आम्ही अजिबात विचार केला नाही. महाविकास आघाडीचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांसोबत राहील,' असे पवार यांनी म्हटले आहे.

दरम्यान, पवार यांनी कार्यक्रमातील भाषणावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी कोरोनासंदर्भात आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले.

हेही वाचा - कर्नाटकचा हा राजकीय दहशतवाद संपवावाच लागेल - शिवसेना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.