ETV Bharat / state

'अरे शहाण्या, तू आमदार आहेस.' अजितदादांनी पिळले रोहित पवारांचे कान

मी रोहितला म्हटले, अरे शहाण्या तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही. अन् काहीजण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (depudy chief minister ajit pawar) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे कान धरले.

अजित पवार
अजित पवार
author img

By

Published : Nov 14, 2021, 2:54 PM IST

बारामती - ‘काल कर्जत-जामखेड(Karjat Jamkhed)ला गेलो होतो. मात्र तिकडे कोणीही मास्क वापरत नसल्याचे निदर्शनास आले. मी रोहितला म्हटले, अरे शहाण्या तू आमदार आहेस. तू मास्क वापरला तर मला इतरांना सांगता येईल. मी भाषण करताना मास्क काढत नाही. अन् काहीजण मास्कच वापरत नाहीत. हे बरोबर नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार (depudy chief minister ajit pawar) यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचे कान धरले.

अजित पवार

'टोकाची भूमिका घ्यायला लावू नका'

बारामती तालुक्यातील धुमाळवाडी येथील एका संस्थेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. ते म्हणाले, की कोरोना गेलेला नाही. काळजी घेणे ही सर्वांची जबाबदारी आहे. तिसरी लाट आली तर त्याची मोठी किंमत मोजावी लागेल. लसीकरण (Vaccination) करून घ्या. टोकाची भूमिका घ्यायला लावू नका. लसीकरण वाढवण्याकरीता उपक्रम राबवा. लसीकरण झाल्यावर जरी कोरोना झाला तरी माणूस वाचतो.

कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय घेतला. नियमित कर्जफेड करणाऱ्याला ५० हजारांचे बक्षिस देण्याची घोषणा करण्यात आली. मात्र कोरोनामुळे आर्थिक घडी विस्कटली. परिणामी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे बक्षीस देता आले नाही. मात्र आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर ही रक्कम देता येईल. कोरोनाच्या संकट काळातही केंद्राकडून जीएसटीची रक्कम मिळाली नाही, असे ते म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.