बारामती - सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विरोधक धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. दरम्यान यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. पोलीस प्रशासनाने याप्रकरणी योग्य तो तपास करून सत्यता पुढे आल्यानंतर योग्य ते निर्णय घेतला जाईल, असे अजित पवार म्हणाले.
काय म्हणाले अजित पवार?
आरोप करणाऱ्या महिलेसंदर्भात भाजपाचे उपाध्यक्ष व मनसेचे एक नेते व एयर लाईन मधील एका व्यक्तीने आरोप केले आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने सदर प्रकरणी योग्य तो तपास करून सत्यता पुढे आल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल. असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. शारदानगर कृषीविज्ञान केंद्रात कृषी तंत्रज्ञान सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
दिल्लीत सुरू असणाऱ्या शेतकरी आंदोलनाबाबत पवार म्हणाले की, शेतकऱ्यांबाबत केंद्र सरकार सकारात्मक नाही. केंद्र सरकारला शेतकऱ्यांबाबत कोणतीही आस्था नसून केंद्राला स्वारस्य नसल्याचे दिसत आहे. लाखाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांचा हा अपमान आहे, असे पवार यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा- कोल्हापुरात मतमोजणी केंद्राबाहेर भानामतीचा प्रकार
हेही वाचा- तृतीयपंथी अंजलीची 'रिक्षा' सुसाट; ग्रामपंचायतवर झेंडा फडकवणारी पहिली तृतीयपंथी