ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षकांनी केली दौंड तालुक्याची पाहणी

दौंड तालुक्यात आजपर्यंत आढळलेले संशयित रुग्ण, बाधित रुग्ण, स्वॅब टेस्टिंग, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण, जनजागृती अशा विविध स्वरूपाच्या करण्यात आलेल्या कामकाजविषयी त्यांनी माहिती घेतली.

author img

By

Published : Jun 10, 2020, 8:19 PM IST

Covid 19 in pune
दौंड कोरोना परिस्थितीची पाहणी

पुुणे - जिल्हाधिकारी नवल किशोर राम आणि पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज दौंड येथील प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी केली. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली.

यावेळी विलगीकरण कक्ष, नागरिकांसाठी देण्यात आलेल्या सेवा- सुविधा, भोजन सुविधा याबाबतची सविस्तर माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी घेतली. तसेच येथील कोरोना परिस्थितीबाबत महसूल, पोलीस विभाग व वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

यावेळी नवल किशोर राम म्हणाले, कोरोना नियंत्रणासाठी सोशल डिस्टनसिंगची व स्वच्छतेच्या खबरदारीची प्रभावी अंमलबजावणी करावी, तसेच कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होवू नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक ती दक्षता घ्यावी. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक, उच्च रक्तदाब, श्वसनाचे विकार असणाऱ्या नागरिकांची माहिती अद्ययावत करुन त्यांच्या तपासणीवर भर देऊन अधिक काळजी घ्यावी, असे श्री. राम यांनी सांगितले. नागरिकांनी देखील स्वयंशिस्त पाळण्याबरोबरच मास्क, सॅनिटायझर, हॅन्ड ग्लोज चा वापर व सोशल डिस्टनसिंग पाळून कोरोनवर मात करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना केले.

दौंड तालुक्यात आजपर्यंत आढळलेले संशयित रुग्ण, बाधित रुग्ण, स्वॅब टेस्टिंग, नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, सर्वेक्षण, जनजागृती अशा विविध स्वरूपाच्या करण्यात आलेल्या कामकाजविषयी त्यांनी माहिती घेतली.

यावेळी पोलीस उप अधीक्षक ऐश्वर्या शर्मा, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, तहसीलदार संजय पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संग्राम डांगे व अन्य संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.