ETV Bharat / state

अवैध वाळू उपसा करून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी केले तडीपार - दौंड पोलिसांनी केले दोघांना तडीपार

दौंड तालुक्‍यातील २ वाळू माफियांना पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर, इंदापूर, बारामतीसह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्‍यांतून ४ महिन्यांकरिता तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तयार केला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार दोघांना तडीपार करण्यात आले.

दौंड पोलिसांनी केले दोघांना तडीपार
दौंड पोलिसांनी केले दोघांना तडीपार
author img

By

Published : Feb 26, 2021, 5:52 PM IST

पुणे - अवैध वाळू उपसा करून दहशत निर्माण करणाऱ्या दोघांना दौंड पोलिसांनी तडीपार केले आहे. दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी खंडणी मागणे, खून, गंभीर दुखापत, विनयभंग, शिवीगाळ, दमदाटी यांसारखे गुन्हे केले आहेत. तडीपारीच्या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

दोन वाळू माफिया तडीपार
दोन वाळू माफिया तडीपार

दोन वाळू माफिया तडीपार :

दौंड तालुक्‍यातील २ वाळू माफियांना पुणे जिल्ह्यातील दौंड, शिरूर, इंदापूर, बारामतीसह अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, सोलापूर जिल्ह्यातील करमाळा या तालुक्‍यांतून ४ महिन्यांकरिता तडीपार करण्यात आले आहे. तडीपारीच्या कारवाईचा प्रस्ताव दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी तयार केला होता. पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दिलेल्या आदेशानुसार दोघांना तडीपार करण्यात आले.

विष्णू उर्फ लाला बलभिम अमनार आणि नितीन सुनील लवंगारे अशी तडीपार केलेल्यांची नावे आहेत.

अनेक गंभीर गुन्हे :

दोघांची वाळू व्यवसायात एक टोळी आहे. या टोळीची दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी खंडणी मागणे, खून, गंभीर दुखापत, विनयभंग, शिवीगाळ, दमदाटी यांसारखे गुन्हे केलेले आहेत. त्यांच्यामुळे दौंड तालुक्यात आणि पुणे जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या टोळीची बेकायदेशीर कृत्ये रोखण्यासाठी आणि लोकांच्या सुरक्षेसाठी आरोपींना हद्दपार केले आहे, अशी माहिती दौंड पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार यांनी दिली आहे.

हेही वाचा - भारताच्या वर्ल्डकपविजेत्या संघातील खेळाडूची क्रिकेटमधून निवृत्ती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.