पुणे : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी केलेल्या विधानानंतर दौंड येथील मराठा महासंघाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले (Daund Activists of Maratha Federation Protest) आहेत. कर्नाटक एसटी महामंडळाच्या निपाणी औरंगाबाद एसटीला काळे फासून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा निषेध करण्यात आला आहे. यावेळी एसटी वरच्या कानडी भाषेतील मजकूराला देखील काळे फासण्यात आले (Protest against Karnataka CM by black hanging ST) आहे.
कर्नाटक सरकारचा जाहीर निषेध : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेताल वक्तव्य केल्याने दौंडमधील मराठा महासंघाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. कर्नाटक एसटी महामंडळाच्या निपाणी-औरंगाबाद एसटीला काळे फासून कर्नाटक सरकारचा आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे. दौंडमधून जाणाऱ्या कर्नाटक एसटीवर जय महाराष्ट्र आणि जाहीर निषेध असा मजकूर लिहिण्यात आला असून कानडी भाषेतील मजकूर काळे फासून पुसण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या विरोधात घोषणाबाजी देण्यात आल्या (Protest against Karnataka CM) आहे.