पुणे - शहरात बुधवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या भागातील बैठी घरे, सोसायट्यांचे पार्किंग तळ घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. या पावसामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मात्र दत्तवाडी परिसरातील राहणाऱ्या शिला गायकवाड यांना गेल्या 3 वर्षांपासून थोडा जरी पावसाचा जोर वाढला तरी घरात शिरणाऱ्या पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील बऱ्याच भागातील नागरिकांना पावसाचे पाणी घरात शिरल्यानंतर कशा प्रकारे समस्या निर्माण होतात. याचा पहिल्यांदाच प्रत्यय आला असेल. मात्र, दत्तवाडी परिसरात राहणाऱ्या शिला गायकवाड हे गेल्या ३ वर्षापासून अशा प्रकारच्या समस्येला तोंड देत आहेत. गायकवाड या गेल्या अनेक वर्षांपासून त्या परिसरात राहत आहेत. घरात एकूण 7 सदस्य असून एकत्र कुटुंब राहणाऱ्या या गायकवाड परिवाराला गेल्या 3 वर्षांपासून थोडं जरी जास्त पाऊल झाले तरी घरात पाणी येत असल्याने गायकवाड कुटुंबीयांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
तीन वर्षांपूर्वी स्थानिक नगरसेवकाच्यावतीने ड्रेनेज लाईनच काम करण्यात आले. घराच्या शेजारूनच ड्रेनेज लाईनचे काम झाले. मात्र एक ते दीड फुटाची गटार बांधल्याने जास्त पाऊस झाल्याने ड्रेनेज लगेच भरतो आणि संपूर्ण घरात पाणीच पाणी होऊन जाते. या 3 वर्षात पावसाळ्यात अनेक रात्री जागवून घरातील पाणी काढले असल्याची व्यथा त्यांनी ईटीव्ही भारतला सांगितली. अनेक वेळा महापालिकेला तक्रार देऊनही महापालिकेच्या अधिकारांच्यावतीने फक्त आश्वासने दिली जातात. मात्र, कोणतेही काम होत नाही. पावसाच्या पाण्याने घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बेड,घरातील साहित्य किती वेळा बदलायचे. प्रशासनाने ड्रेनेजलाईनचा काम परत करावे, अशी मागणी यावेळी शिला गायकवाड यांनी केली. शहरात जोरदार पाऊस झालं की अनेकांच्या घरात पाणी शिरणे, झाडपडीच्या घटना, घडत असतात पण महापालिकेच्या एका चुकीच्या कामाचा फटका गायकवाड कुटुंबीयांना गेल्या 3 वर्षांपासून बसत आहे.