बारामती ( पुणे ) - बारामतीकरांचे श्रद्धा असणारे शहरातील प्राचीन दत्त मंदिर काल रात्री (ता. २६ बुधवार ) अचानक जमीनदोस्त करण्यात आले आहे. यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
नीरा डावा कालव्यालगत दत्त मंदिर आहे. याचे बांधकाम खूप जूने आहे. शहरातील विविध धर्मिय स्थळांपैकी हे एक मंदिर आहे. मात्र, काल रात्री अचानक हे मंदिर जमीनदोस्त करण्यात आले आहे.
गुरूवार हा श्री दत्त गुरूंचा वार आहे. दर गुरूवारी येथे दर्शनासाठी मोठी गर्दी होते. आज देखील अनेक भाविक दर्शनाला आले होते. मात्र ,रात्रीत जमीनदोस्त झालेले मंदिर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. यामुळे भाविकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पाकिस्तानात असणाऱ्या हिंदूंची जी व्यवस्था आहे. तीच बारामतीतील हिंदूंची अवस्था झाल्याचे सांगून येथील श्री दत्त मंदिर जमीन दोस्त करून मूर्ती चोरणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड सुधीर पाटसकर यांनी केली आहे. दरम्यान, हे मंदिर कोणी व कोणत्या कारणासाठी जमीनदोस्त केले, याची माहिती मिळू शकलेली नाही.
हेही वाचा - काम अपूर्ण असलेल्या जम्बो कोविड केअर सेंटरचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन?
हेही वाचा - सरकारने दूधवाढीसंदर्भात भूमिका न बदलल्यास मंत्र्यांना दुधाने आंघोळ घाला - राजू शेट्टी