ETV Bharat / state

अंगारकी चतृर्थीला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद - अंगारकी चतृर्थीला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर बंद

खबरदारीचा उपाय म्हणून २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे.

dagdusheth Ganpati temple will be close on Angarki Chaturthi due to corona
अंगारकी चतृर्थीला पुण्यातील दगडूशेठ गणपती मंदिर दर्शनासाठी बंद
author img

By

Published : Feb 27, 2021, 11:46 AM IST

पुणे - कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारीचा उपाय म्हणून २ मार्च रोजी अंगारकी चतुर्थीला मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टने घेतला आहे. केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत मंदिरात धार्मिक विधी होतील, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी दिली आहे.

रिपोर्ट

दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येतात दर्शनाला -

अंगारकी चतुर्थीला शहर व उपनगरांतून दरवर्षी येणाऱ्या सुमारे ३ ते ४ लाख भाविक मंदिरामध्ये दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून मंगळवारी मंदिर बंद ठेवण्यात येणार आहे. चतुर्थीच्या दिवशी भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.

भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा लाभ घ्यावा -

अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तसेच इतरही दिवशी भक्तांकरीता अभिषेक व्यवस्था व इतर पूजा ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा ट्रस्टने केली आहे. भक्तांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी केल्यास त्यांच्यावतीने गुरुजींद्वारे धार्मिक विधी होऊ शकतील. तसेच घरबसल्या दर्शनाची सोयदेखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर माध्यमांद्वारे २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे. तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

मंदिरात हार, नारळ स्विकारणे बंद -

पुण्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये भाविकांकडून प्रसाद, फुले, हार स्विकारणे बंद केले आहे. तसेच येणाऱ्या भाविकांची तापमान तपासणी, सॅनिटाझेशन, मास्क ही नियमावली पाळून मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात कोणालाही बसण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य सरकारने जी नियमावली आखून दिली आहे. त्याचे काटेकोरपणे पालन मंदिरात केले जात आहे.

हेही वाचा - इकबाल मिरचीच्या पत्नीसह मुले फरार आर्थिक गुन्हेगार घोषित, मालमत्तेवरही टाच

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.