पुणे - कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उपायोजना म्हणून देश लॉकडाऊन करण्यात आला. यामध्ये बऱ्याच सेवा खंडित झालेल्या असताना राज्यातील पोस्ट कार्यालये मात्र अनेकांच्या मदतीला धावली आहेत. लॉकडाऊनच्या काळात साधारणता शरद भोजन योजनेत पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 79 हजार डिजिटल खाती सुरू करण्यात आली. तसेच अनेक रुग्णांच्या उपचारासाठी औषधांचे पार्सल जिल्ह्याबरोबरच राज्यात आणि देशात विविध ठिकाणी पोहोचवण्याचे महत्त्वाचे काम पोस्ट कार्यालयाने केले आहे.
लॉकडाऊनपासून पोस्ट ऑफिसच कामकाज 'सुसाट' कोरोनाच्या पश्वभूमीवर लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. तर अनेक व्यवसाय बंद पडले. पण लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून सुरू असलेल्या पोस्ट खात्यांच्या मार्फत नागरिकांना विविध सोयी सुविधा देण्यात आल्या. याचा पोस्ट कार्यालयालाही फायदा झाला असून लॉकडाऊन नंतरही मोठ्या प्रमाणात नागरिकांचा पोस्टाची सेवा वापरण्याचा कल वाढल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनपासून पोस्ट ऑफिसच कामकाज 'सुसाट' लॉकडाऊनच्या काळात पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, रिकरिंग डिपॉझिट अशा विविध बचत योजनांची ऑनलाईन सुविधा तसेच फिरते एडीएम योजना, रोख रकमेची घरपोच अशा विविध योजनांच्या माध्यमातून पोस्टाने सर्वसामान्यांना सेवा दिली आहे. तसेच पोस्टाने लॉकडाऊनमध्येही जेष्ठ नागरिकांच्या घरोघरी जाऊन त्यांना पेंशन देण्याचा उपक्रम राबविला होता. पोस्टाच्या जनसेवेमुळे नागरिकांध्येही विश्वासहर्ता वाढली आहे. लॉकडाऊननंतर गुंतवणुकीसाठी तसेच विविध योजनांसाठी नागरिकांचा पोस्टाकडे कल वाढला असल्याची माहिती वरिष्ठ पोस्ट मास्तर बी.पी.एरंडे यांनी दिली.
लॉकडाऊनपासून पोस्ट ऑफिसच कामकाज 'सुसाट' लॉकडाऊनमध्ये अनेक सण उत्सव सर्वसाधारणपणे साजरा करण्याची वेळ सर्वांवर आली. अशातच रक्षाबंधनाच्या वेळेस आपल्या भावाला राखी पाठवण्यासाठीही पोस्टाने विशेष सेवा दिली होती. विशेष म्हणजे जम्मू काश्मीर येथे देशाच्या संरक्षणासाठी उभे असलेल्या जवानांसाठीही पोस्टाच्यावतीने राख्या पाठवण्यात आल्या. तसेच लॉकडाऊनमध्ये वाहतूक बंद असल्याने अनेकांचे पार्सल पाठवण्याचीही विशेष सोय पोस्टाच्यावतीने करण्यात आली.तसेच कोणत्याही बँकेत खाते असेल आणि त्याला आधार लिंक असेल तर पोस्टातून पैसे देण्याची सोयही करण्यात आली होती. त्याचाही लोकांना फायदा झाला. लॉकडाऊन मुळे घराबाहेर पडणे मुश्कील झाले होते अशावेळी पोस्टाचे कर्मचारी प्रसंगी पीपीई किट घालून हॉटस्पॉट, कंटेन्मेंट झोनमध्येही जाऊन नागरिकांना पैसे पोहोच करण्याचे काम करत होते. विशेषता आजारी, ज्येष्ठ आणि दिव्यांग नागरिकांना याचा मोठा फायदा झाला.राज्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्यानंतर औषधांची कमतरता भासू लागली, अशावेळी रुग्णांपर्यंत औषध पोहोचवण्यात पोस्टाने मोठी कामगिरी केली. तसेच पोस्टामार्फत शेतकऱ्यांचे आंबेही ग्राहकांपर्यंत पोहोच करण्याची सेवाही दिली गेली. लॉकडाऊनच्या काळात सारे काही ठप्प असताना पोस्टाच्या कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घालून सर्वसामान्यांसाठी मदतीचा हात पुढे केला. याचाच फायदा पोस्ट ऑफिसला झाला असुन लॉकडाऊनपूर्वी असलेल्या उत्पन्नांत आणि लॉकडाऊननंतरच्या उत्पन्नात 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे.