ETV Bharat / state

विशेष बातमी; पिंपरीत गुलाबी थंडीची चाहूल; पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी - पिंपरीत गुलाबी थंडीची चाहूल; पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी

नागरिकांनी घराबाहेर पडून सकाळी निसर्गरम्य ठिकाणी जायला हवे. जेणेकरून कोरोनामुळेआलेली मरगळ दूर होईल. आरोग्य चांगले आणि निरोगी राहील, असे आवाहन दुर्गा टेकडी परिसरातील नागरीक करत आहेत.

पिंपरीत गुलाबी थंडीची चाहूल; पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी

author img

By

Published : Jan 31, 2021, 1:48 PM IST

पुणे (पिंपरी-चिंचवड)- गेल्या चार दिवसांपासून पिंपरी-चिंचवड शहरात थंडी वाढली आहे. त्यामुळे येथील प्रसिद्ध ठिकाण असलेल्या दुर्गा देवी टेकडीवर सकाळी नागरिकांची वर्दळ वाढल्याचे पाहायला मिळत आहे. निरोगी आयुष्यसाठी दररोज व्यायाम करण्याबरोबर निसर्गरम्य वातावरणात सकाळी फिरायला हवे, असा मूलमंत्र येथील नागरिकांनी दिला आहे.

पिंपरीत गुलाबी थंडीची चाहूल; पर्यटनस्थळी नागरिकांची गर्दी
लोणावळा, महाबळेश्वरपेक्षा दुर्गा देवी टेकडी कमी नाहीपिंपरी-चिंचवड शहरातील दुर्गा देवी टेकडी ही लोणावळा आणि महाबळेश्वर पेक्षा कमी नाही असे मत या भागातील नागरिक व्यक्त करतात. निगडीतील दुर्गा देवी टेकडी परिसर महानगर पालिकेने विकसित केला आहे. कोरोनाच्या अगोदर नागरिक नियमितपणे इथे व्यायामासाठी आणि भटकंतीसाठी येत होते. परंतू, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावानंतर पर्यटस्थळी जाण्यास बंदी घालण्यात आली होती.

गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी गर्दी
शहरात गेल्या चार दिवसांपासून चांगलीच थंडी पडत आहे. या थंडीचा आनंद घेण्यासाठी नागरिक बाहेर पडत आहेत. रविवार सुट्टीचा वार असल्यामुळे दुर्गा देवी टेकडी परिसरात नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी लहान मुलांसह वृद्ध, तरुण मॉर्निंग वॉक करताना दिसत होते.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.