राजगुरूनगर (पुणे) - 'गावाला परत जायचंय' अशी मागणी रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कामगार गेल्या महिन्यापासुन करत आहेत. दरम्यान परराज्यात जाण्यासाठी परवानगी मिळाल्याने आज पहाटेपासुनच शिक्रापूर परिसरात परराज्यातील कामगारांनी नावनोंदणीसाठी गर्दी करत रांगा लावल्या आहे. याठिकाणी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडाला आहे.
कोरोना व्हायरसने जगभर धुमाकूळ घातला असून कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन 17 मे पर्यंत वाढविण्यात आले आहे. विविध राज्यांत अडकलेल्या कामगारांना आपाआपल्या राज्यात जाण्यासाठी आता केंद्र व राज्य सरकारने या कामगारांना काही नियम व अटींसह परवानगी दिली आहे. त्यामुळे कामगारांना त्यांच्या मुळगावी परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
जिल्ह्याच्या रांजणगाव सणसवाडी औद्योगिक वसाहतीत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांनी आपल्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्र सरकारने घालून दिलेले नियम व अटींच्या पूर्ततेचे फॉर्म घेण्यासाठी शिक्रापूर येथे परप्रांतीय कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. फॉर्म घेण्यासाठी कामगारांनी अर्धा किलोमीटरपर्यंत लांब रांगा लावल्या आहेत. तर जमावबंदीच्या नियमांचा पार फज्जा उडाला आहे.
परराज्यात जाण्यासाठी कामगारांची गर्दी; शिक्रापूर परिसरात सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा
परराज्यात जाण्यासाठी परवानगी मिळाल्याने आज पहाटेपासुनच शिक्रापूर परिसरात परराज्यातील कामगारांनी नावनोंदणीसाठी गर्दी केली आहे. याठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.