ETV Bharat / state

Butterflies Garden : फुलपाखरांचे गाव म्हणून पुणे जिल्ह्यातील 'या' गावाची होतेय ओळख - फुलपाखरांचे गाव

भोर तालुक्यातील पिसावरे या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. ही ओळख येथील शाळेत शिकणाऱ्या लहानग्या विद्यार्थ्यांनी मिळवून दिली आहे. निर्सगसंपन्न असलेल्या या गावातील रहिवासीही निसर्गाची जोपासना करतात. यामुळेच निसर्गानेही त्यांना ही नवीन ओळख बहाल केली आहे. याशिवाय गावातील विद्यार्थ्यांनाही आता निसर्गाची गोडी लागलेली आहे.

फुलपाखरू
फुलपाखरू
author img

By

Published : Mar 3, 2022, 8:27 PM IST

पुणे - भोर तालुक्यातील पिसावरे या गावाला फुलपाखरांचे गाव म्हणून ओळखले जात आहे. ही ओळख येथील शाळेत शिकणाऱ्या लहानग्या विद्यार्थ्यांनी मिळवून दिली आहे. निर्सगसंपन्न असलेल्या या गावातील रहिवासीही निसर्गाची जोपासना करतात. यामुळेच निसर्गानेही त्यांना ही नवीन ओळख बहाल केली आहे. याशिवाय गावातील विद्यार्थ्यांनाही आता निसर्गाची गोडी लागलेली आहे.

फुलपाखरांचे गाव

या गावात 150 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजातीचे पक्षी 85 पेक्षा जास्त विविध प्रकाराची फुलपाखरे आढळून येतात. कोणत्या झाडावर कोणती फुलपाखरे व पक्षी आढळतात याची संपूर्ण माहिती येथील विद्यार्थ्यांना आहे. नुकतेच पक्षी प्रेमी आणि शिक्षक संतोष दळवी यांनी फुलपाखरांच्या उद्यानाचे उद्घाटन ( Butterflies Garden ) केले.

दळवी यांनी शाळेतील मुलांना पक्षी फुलपाखरे कसे ओळखावे याचे शिक्षण देऊन त्यांच्यात निरीक्षणाची गोडी निर्माण केली आहे. यासाठी ते आवर्जून विद्यार्थ्यांना पक्षी, फुलपाखरे निरीक्षणासाठी सभोवतालच्या परिसरात घेऊन जातात. यामुळे आता मुलांना त्याची गोडी इतकी लागली की मुले मोबाइल न खेळाता आपल्या गावाच्या सभोवताली निसर्गाच्या कुशीत कोणते पशु, पक्षी, फुलपाखरांचा रहिवास आहे याची नोंद ठेवतात. यासाठी त्यांनी एक स्वत्रंत अॅपही तयार केले आहे.

हेही वाचा - SPECIAL : मुलाच्या अभ्यासासाठी गच्चीवर फुलवली बाग, 600 हून अधिक फुलपाखरांचा जन्म.. पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.