ETV Bharat / state

पुणे विभागातील कोरोनाबाधितांचा आकडा हजारावर तर 172 कोरोनाबाधित घरी परतले - PUNE CORONA UPDATE

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक 936 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 21 बाधित रुग्ण असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात 37 बाधित रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

COVID 19 PATIENT COUNT IN PUNE SECTION SAID BY DR MHAISEKAR
डॉ. दीपक म्हैसेकर
author img

By

Published : Apr 23, 2020, 9:58 PM IST

पुणे - विभागातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1 हजार 31 झाली असून, विभागात 172 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तसेच सध्या ॲक्टिव्ह रुग्ण 794 आहेत तर या विभागात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 65 वर गेली आहे. तसेच 13 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्हयात सर्वाधिक 936 कोरोनाबाधित रुग्ण असून जिल्ह्यात 59 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्ह्यात 21 बाधित रुग्ण असून, 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 37 बाधित रुग्ण असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्ह्यात 27 कोरोनाबाधित रुग्ण असून, एकाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 10 कोरोनाबाधित रुग्ण आहेत.

आजपर्यंत विभागामध्ये एकूण 11 हजार 707 नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यापैकी 11 हजार 46 जणांचे अहवाल प्राप्त झाल असून, 662 जणांच्या नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 9 हजार 964 जणांच्या नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून, 1 हजार 31 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 47 लाख 51 हजार 802 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून, त्याअंतर्गत 1 कोटी 82 लाख 71 हजार 857 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 927 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.