ETV Bharat / state

माळेगाव साखर कारखाना निवडणूक : बारामतीत मतमोजणीला सुरुवात, कोण मारणार बाजी? - baramati malegaon sugar factory

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यातील संचालक मडंळाच्या २१ जागांसाठी निलकंठेश्वर पॅनलकडून २१, सहकार बचाव पॅनलकडून २१ व इतर १४ असे एकूण ५६ उमेदवारांचे भवितव्य आज कळणार आहे.

बारामतीत मतमोजणीला सुरुवात
बारामतीत मतमोजणीला सुरुवात
author img

By

Published : Feb 24, 2020, 1:44 PM IST

पुणे - माळेगाव सहकारी साखर कारखाना संचालक मंडळ निवडीची मतदान प्रक्रिया काल (दि.२३) पार पडली. तर, आज बारामती येथील जयश्री गार्डन येथे मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

बारामतीत मतमोजणीला सुरुवात

बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. यातील संचालक मडंळाच्या २१ जागांसाठी निलकंठेश्वर पॅनलकडून २१, सहकार बचाव पॅनलकडून २१ व इतर १४ असे एकूण ५६ उमेदवारांचे भवितव्य आज कळणार आहे. कारखान्याच्या या निवडणुकींकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तब्बल २ महिने जाणीवपूर्वक लक्ष देऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. गेल्या पंचवार्षीक निवडणुकीत पवारांना पराभव पत्कारावा लागला होता. कारखाना ताब्यातून गेल्याची सल पवारांना होती. त्यामुळेच या निवडणुकीच्या निकालाकडे राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही वाचा - माळेगाव साखर कारखाना निवडणूक : मतमोजणीला दीड तास उशीर, मतपेट्या बदलल्याचा आरोप

मागील १० दिवसांपासून प्रचारादरम्यान दोन्ही पॅनलकडून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. तसेच समाज माध्यामांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत, घोंगडी बैठका, जाहीर सभा, भित्तीपत्रके, लाऊडस्पीकरचा वापर करत प्रचाराचा धुराळा उडवून देण्यात आला होता. सध्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, दोन्ही पॅनलसाठी प्रतिष्ठेच्या असणाऱ्या या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - लोणावळ्यात जागतिक दर्जाची मॅरेथॉन स्पर्धा संपन्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.