पुणे- जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण झपाट्याने वाढत असताना त्यांच्या संपर्कात येणा-यांना कोरोनाची लागण होण्याची भीती असते. पुण्यातील एका आधिका-याला कोरोनाची लागण झाल्याचे मंगळवारी समोर आल्यानंतर त्याच्या रोज संपर्कात असणाऱ्या खेड तालुक्यातील एका व्यक्तीला औंध येथील रुग्णालयात तपासणी सायंकाळच्या सुमारास नेण्यात आले आहे.
संबधित व्यक्ती तिन्हेवाडी ता. खेड येथील असून पुण्यात नोकरी निमित्त रोज येऊन-जाऊन करीत आहे. तो काम करीत असलेल्या कार्यालयात एक अधिकारी मंगळवारी कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या नियमितपणे संपर्कात असलेल्या पैकी तिन्हेवाडी मधील व्यक्तीला आज सायंकाळी आरोग्य विभागाने ताब्यात घेतले आहे. त्या संशयित व्यक्तीच्या कुटुंबातील व्यक्तींना प्राथमिक शाळेत विलगीकरणात ठेवण्यात आले.
या व्यक्तीच्या कुटुंबातील संपर्क झालेल्या सर्व व्यक्तींना स्थानिक प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बळीराम गाढवे यांनी दिली.
पुण्याच्या ग्रामीण कोरोनाचा शिरकाव ..?
कोरोनाचा समुह संसर्ग रोखण्यासाठी राजगुरुनगर व परिसरात लॉकडाऊन कडक करण्यात आले आहे. पोलीस व प्रशासन दिवसरात्र मेहनत घेत आहे. मात्र,नागरिकांना कोरोनाचे गांभीर्यच राहिले नसुन नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर येत आहेत. यामुळे कोरोनाचा समुह संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त केली जात आहे. नागरिकांनी कोरोनावर मात करण्यासाठी स्वत:हून घरात राहून प्रशासनाला सहकार्य करुन कोरोनाच्या या लढाईत लढाई यशस्वी होण्यासाठी मदत करण्याचे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले आहे.
कोरोनाबाधिताच्या संपर्कातील व्यक्तीला राजगुरुनगर परिसरातून घेतले ताब्यात
पुण्यात एका अधिकाऱ्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीला तपासणीसाठी ताब्यात घेतले असून त्यांच्या कुटुंबाला प्राथमिक शाळेत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.