पुणे - ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर योग्यरित्या उपचार केले जात नाही. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नातेवाईकांना क्वारंटाईन केले जात नाही. कमी-जास्त झाले तर रुग्णाला इतर रुग्णालयात जाण्यास सांगतात. लॉकडाऊन होऊन 19 दिवस झाले तरी ससून प्रशासनाला 11 मजली इमारत तयार असताना आयसोलेशन कक्ष तयार करता आले नाही. आपली जबाबदारी दुसऱ्या रुग्णालयावर टाकण्याचे काम हे रुग्णालय करत आहे, असा आरोप पुणे महापालिकेचे काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला.
'कोरोनाबाधितांवर उपचारादरम्यान हलगर्जीपणा; ससून रुग्णालयाच्या 'डीन'वर कारवाई करा' - pune corona
कोरोनाबाधित रुग्णांकडे ससून रुग्णालयाचे 'डिन' व्यवस्थित लक्ष देत नाहीत. ससून रुग्णालय प्रशासन पुणेकरांच्या जीवाशी खेळत आहे. ससून रुग्णालयाचे डिन अजय चंदनवाले यांना समज देऊन तातडीने उपाययोजना करण्यात याव्या, अन्यथा त्यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई तरी करण्यात यावी, अशी मागणी अरविंद शिंदे यांनी केली.
पुणे
पुणे - ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांवर योग्यरित्या उपचार केले जात नाही. रुग्णांच्या संपर्कात येणाऱ्या नातेवाईकांना क्वारंटाईन केले जात नाही. कमी-जास्त झाले तर रुग्णाला इतर रुग्णालयात जाण्यास सांगतात. लॉकडाऊन होऊन 19 दिवस झाले तरी ससून प्रशासनाला 11 मजली इमारत तयार असताना आयसोलेशन कक्ष तयार करता आले नाही. आपली जबाबदारी दुसऱ्या रुग्णालयावर टाकण्याचे काम हे रुग्णालय करत आहे, असा आरोप पुणे महापालिकेचे काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी केला.
Last Updated : Apr 12, 2020, 8:43 PM IST