पुणे - कोरोनाचा फटका येत्या काळात सर्वच क्षेत्रात जाणवणार आहेत. याचा सर्वाधिक फटका पुण्याच्या मेट्रोच्या कामाला बसणार आहे. वनाज ते रामवाडी आणि पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गाचे काम काही प्रमाणात पूर्ण झाले असले तरी सध्या मेट्रोच काम पूर्णपणे बंद आहे. यामध्ये मेट्रोच्या कामाला मोठा ब्रेक लागणार आहे. मेट्रोच्या कामात सर्वाधिक कामगार हे महाराष्ट्राबाहेरील आहेत. त्यामुळे भविष्यात ते राज्यात आले नाहीतर मेट्रोच्या कामासाठी लागणारी कामगारवर्ग कमी पडणार असून परिणामी मेट्रो पूर्ण होण्याचा कालावधी ही वाढणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने सर्व जिल्हे सिल केले आहे. जो जिथे आहे तिथेच रहा, असे आदेश देण्यात आहे. संचारबंदीच्या काळात जो तो आपल्या गावी जाण्यासाठी प्रयत्न करत आहे. कोरोनाचा धोका पाहता जो जिथे आहे तिथेच राहणे पसंत करणार आहे. मात्र, संचारबंदी हटवल्यानंतरही अपापल्या गावाला गेलेले मजूर परत शहरात येईल, असे तरी सध्या दिसत नाही. याचाच सर्वाधिक फटका महामेट्रोला बसणार आहे.
हेही वाचा - कोरोनाबाधित मृत व्यक्तीसोबत घडलेला प्रकार दुर्दैवी - महापौर मोहोळ