पुणे - पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील एका पोलीस ठाण्याच्या चौकीत संशयित आरोपीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कातील पाच पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर क्वारंटाइन होण्याची वेळ आली आहे. आधीच पोलीस आयुक्तालयातील ७ जण पोलीस हे कोरोनाबाधित आढळले होते. पैकी, एका अधिकाऱ्याला डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एका पोलीस अधिकाऱ्यांमुळे चार जणाला कोरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर सर्व जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान, दोन भावंडाची घरगुती भांडण एका चौकीत पोहोचली. तेव्हा एकाची अदखलपात्र तक्रार घेण्यात आली, तर दुसऱ्याला नोटीस बजावत समजूत काढून घरी पाठवून देण्यात आले. पैकी, एकाला सर्दी आणि खोकला लागल्याचे निदर्शनास आले. तेव्हा तो औंध येथील जिल्हा रुग्णालयात गेला असता, त्याला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले. यामुळे संबंधित चौकीतील ५ जण क्वारंटाइन झाले आहेत.