पुणे - कोरोनामुळे मागील चार महिन्यांपासून सर्व व्यवहार ठप्प आहेत. अशा काळात वाघ्या-मुरळी सारख्या कलांवताची उपासमार होत आहे. राज्यातील अशा कलांवतांनी आम्हाला मदत करा, अशी साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घातली आहे. यासाठी त्यांनी मल्हार देवाचा भंडारा ठाकरे यांना पाठवला आहे.
कोरोनामुळे देशभरातील व्यवसाय थांबले आहेत. यात कलांवतांकडे कोणतेही काम नाही. अशा कठिण काळात सरकारकडून कलांवतासाठी अद्याप कोणतीही मदत जाहीर करण्यात आलेली नाही. यामुळे कलांवतांवर उपासमारीची वेळ आली आहे.
हेही वाचा - नात्याला काळिमा..! चुलत भावाने केला बहिणीचा विनयभंग
लॉकडाऊननंतर अनलॉकमध्ये वाघ्या-मुरळी या कलांवतांना फिजिकल डिस्टन्सिंग ठेऊन जागरण गोंधळ कार्यक्रम करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी यावेळी कलांवतांनी केली आहे. तसेच कलांवतांना आर्थिक मदतही शासनाने जाहीर करावी, अशी मागणी वाघ्या-मुरळी परिषदेचे मार्तंड साठे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या मागणीची आठवण राहावी यासाठी त्यांनी ठाकरे यांना मल्हार देवाचा भंडारा पाठवला आहे.
हेही वाचा - पिंपरी-चिंचवड : मुलगा झाल्याचे सांगून सोपवली मुलगी, खासगी रुग्णालयातील धक्कादायक प्रकार