पुणे : बिग बॉस फेम असल्यामुळे बिचुकले यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी अनेक नागरिक येत असतात. त्याचवेळी निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे हे आले असता त्यांची आणि अभिजीत बिचुकले यांची यावेळी भेट झाली. त्यावेळेस इंगळे यांनी फोटो काढण्यासाठी अभिजीत बिचुकले यांना विनंती केली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आल्याने त्यांच्या गळ्यामध्ये लहुजी छावा संघटनेचा रुमाल होता. त्याचवेळेस बिचुकले यांनी माझ्यासोबत फोटो काढायचा असेल, तर हा रुमाल काढून ठेवावा, असे सांगितले. त्यावेळेस सचिन इंगळे याने माझ्या समाजाचा मला अभिमान आहे. मी रुमाल काढू शकत नाही, तुम्ही जा तुमच्यासारखे हजार बिचुकले बघितलेत असे म्हटले. त्यावरूनच दोघांमध्ये वाद झाला.
बिचुकले सदैव वादात : अभिजीत बिचुकले कुठल्या ना कुठल्या कारणाने नेहमी चर्चेत असतात. अभिजीत बिचकुले आणि वाद हा काही नवीन नाही. देशामध्ये कुठेही निवडणूक असेल तर बिचुकले हे अर्ज भरतात. आजसुद्धा कसबा पोटनिवडणुकीसाठी बिचुकले हे त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले हिच्यासह त्यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यातल्या गणेश कला क्रीडा मंडळ येथून निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या कार्यालयामध्ये आले होते.
बिचुकले यांचा झाला होता अपघात : बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांचा 10 जानेवारी, 2023 रोजी पुण्यात अपघात झाला. यात त्यांच्या डोक्याला दुखापत झाली होती. त्यांच्यासोबत प्रवास करणारे ४ मित्र देखील जखमी झाले होते. अपघातानंतर बिचकुले यांना खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला होता.
बिचुकले समाजकार्यातही अग्रेसर : पुण्यातील मंडई येथे अभिजीत बिचुकले यांचे पेढ्याचे दुकान असून त्यानिमित्त ते पुण्यात राहतात. ते त्यांच्या 4 मित्रांबरोबर जात असताना त्यांचा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. आज माझा अपघात झाला असून मला किरकोळ दुखापत झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी 4 दिवस विश्रांती घेत असून लवकरच समाजकार्यासाठी बाहेर येणार असल्याचे यावेळी बिचुकले यांनी सांगितले होते.
बिचुकले यांच्याविषयी थोडक्यात: कवी मनाचा राजकारणी म्हणून बिचकुलेंची महाराष्ट्रात ओळख आहे. बिस बॉस मराठी आणि बिग बॉस हिंदीचा मंच देखील अभिजित बिचुकले यांनी गाजवला आहे. अभिजितने बिचुकले हे मुळचे साताऱ्यातील असून त्यांनी राजकारणाच्या मैदानात देखील नशीब आजमावले आहे. सातारा विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आणि त्यांच्या पत्नीने उमदेवारी अर्ज दाखल केला होता. तसेच युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विरोधात देखील बिचुकले यांनी निवडणूक लढवली आहे. राष्ट्रपती निवडणुकीसाठी देखील बिचुकले यांनी तयारी केली होती. महाराष्ट्रातील राजकारणावर आणि मुद्द्यांवर तो परखड भाष्य करण्यासाठी ते ओळखले जातात.